Home नांदेड देगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत.

देगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत.

47
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_073641.jpg

देगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर: उच्च माध्यमिक बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यात बुधवार पासून [दि.२१] सुरुवात झाली आहे दरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडण्यासाठी जिल्हा शिक्षण विभाग व प्रशासनाने काळजी घेतली आहे .
येथील देगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडत असल्याचे सहाय्यक उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी केंद्रावर भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील शिळवणी, हणेगाव, मरखेल तसेच शहरात मानव्य विकास विद्यालय वै.धुंडा महाराज देगलूरकर व येथील देगलूर महाविद्यालयात अशा सहा ठिकाणी एकूण २४५१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले आहेत. देगलूर महाविद्यालयात काल ६८५ विद्यार्थी ईग्रजीचा पेपर सोडविला,आज जवळपास ३५५विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. दरम्यान या केंद्रावर कॉपीमुक्त अभियानाचे पालन करताना दिसून येत आहे इमारत ,बैठक व्यवस्थाआदि सुविधा उपलब्ध आहेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून योग्य तो बंदोबस्त करण्यात आलेला आहे. दरम्यान देगलूरचे उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेबांनी केंद्रावर{ दि २२}भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.
तसेच दरम्यान काल नांदेड जिल्ह्याचे एस पी श्रीमंत कोकाटे देगलूर चे पोलीस निरीक्षक झुंजारेसाहेब देगलूर येथील तहसीलदार राजाभाऊ कदम , गटशिक्षणाधिकारी तोटरे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी झंपलवाड हे देखील केंद्राला भेट देऊन इमारत, बैठक व्यवस्था , बंदोबस्त याची पाहणी करत याबाबतचा समाधानकारक अभिप्राय नोंदविलाआहे .बैठेपथक ही याठिकाणी आहे.
देगलूर महाविद्यालयात केंद्रप्रमुख म्हणून उपप्राचार्य प्रा.उत्तम कुमार कांबळे हे कार्यरत आहेत . प्राचार्य डॉ मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डाॅ अनिल चिद्रावार, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी हे परिक्षा सुरळीत पार पडण्यासाठी लक्ष ठेऊन आहेत. तर त्यांना वरिष्ठ लिपिक दत्त प्रसन्न साखरे पर्यवेक्षक प्रा संग्राम पाटील डाॅ शेरीकर हे परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मदत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here