Home नांदेड 12 वी बोर्डाच्या परिक्षेत देगलूर येथील वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थी यांची...

12 वी बोर्डाच्या परिक्षेत देगलूर येथील वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थी यांची होतेय गैरसोय.

139

आशाताई बच्छाव

IMG_20240223_073230.jpg

12 वी बोर्डाच्या परिक्षेत देगलूर येथील वै.धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थी यांची होतेय गैरसोय.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-आज पासून महाराष्ट्रात 12 वी बोर्डाच्या परिक्षेला सुरुवात झाली असून, त्याअनुषंगाने देगलूरच्या बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर सावळा गोंधळा विषयी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांना फोनद्वारे अनेक परीक्षार्थी पाल्यांच्या तक्रारारी आल्या,विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी आनंदी असतात की मी लवकरच बारावीच्या परीक्षा देऊन चांगल्याप्रकारे यशस्वी होऊन मी पुढचे चांगले शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाईल,या आशेने पेपर सोडविण्यासाठी विद्यार्थी हा बोर्डाच्या परिक्षेला पेपर देण्यासाठी आले असता देगलूर येथिल वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थींना व्यवस्था बघुन निराश होऊन पेपर ला सामोरे जावे लागले कारण वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थींना पेपर देण्यासाठी 324 विद्यार्थी आले असता त्यांना डेस्क टेबल फक्त 200 होते बाकीच्या 124 विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी डेस्क टेबल उपलब्ध करून न देता प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून त्यांना पेपर देण्याची नामुष्की त्यांच्या वर आली होती, त्याठिकाणी स्वच्छता गृह सुध्दा चांगल्याप्रकारचे उपलब्ध नाही काही बंद होते असे अनेक तक्रारारी 12 वी ला बोर्डाच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थांच्या पाल्यांनी देगलूर शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक धनाजी जोशी यांना फोनद्वारे माहिती दिली असता देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी वै धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाच्या जागेवर पाहणीसाठी गेले असता तेथील प्राध्यापकांनी व बाकीच्या स्टॉफ नी मध्ये जाण्यास रोखले हे प्रकरण देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी तात्काळ फोनद्वारे देगलूर सहाय्यक उपजिल्हाधिकारी कुलदीपजी जंगल साहेब व तहसीलदार राजाभाऊ कदम यांना सांगितले असता उपजिल्हाधिकारी कुलदीपजी जंगल साहेब यांनी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी यांना जागेवर तहसीलदार राजाभाऊ कदम यांना पाठवुन परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असे आश्वासन दिले,व लागलीच देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी लेखी स्वरूपात सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगल साहेब व तहसीलदार राजाभाऊ कदम साहेब व गटशिक्षणाधिकारी तोटरे साहेब यांना निवेदनाद्वारे तक्रार केली व देगलूर तालुक्यातील सर्व बोर्डाच्या परिक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घेण्यासाठी परिक्षा केंद्रावर पत्र पाठवून आदेशित करण्यात यावे असे देगलूर शिवसेना (शिंदे गट)शहर संघटक धनाजी जोशी यांनी सांगितले ….

Previous articleमहानगरपालिका विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन- हेमंत तांबे सर
Next articleदेगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.