Home नांदेड दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दि १७ मे, २०२२...

दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दि १७ मे, २०२२ रोजी आंदोलनात नांदेड, परभणी,लातुर, हिंगोलीतुन हजारो दिव्यांग सहभागी होणार- स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0000.jpg

दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दि १७ मे, २०२२ रोजी आंदोलनात नांदेड, परभणी,लातुर, हिंगोलीतुन हजारो दिव्यांग सहभागी होणार- स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कूंचेलीकर

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष दि,१५ फ्रेबु २२ ते ५ मार्च२२ पर्यंत शिष्टमंडळाने निवेदनावर चर्चा करून मुध्दत देऊन सुध्दा न्याय हक्क मिळालाच नाहि साधे प्रश्नाचे उतर मिळाले नसल्यामुळे दिव्यांग कक्ष जिल्हा परिषद नांदेड यांच्या कडे दि,११ मार्च २२निवेदन, रितसर दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून नांदेड जिल्ह्यातील तहसिलदार,व गटविकास अधिकारी यांच्याकडून न्याय मिळवुन देण्यासाठी तक्रार लेखि निवेदन देऊन हि दिव्यांग कक्ष यांना सुध्दा साधे उतर प्रशासन यांच्या कडुन मिळाले नाही,
अशा कडक उन्हात दि २९ मार्च २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे चारशे दिव्यांग बांधवानी धरने आंदोलन व समविचारी संघटनेने ३० मार्चला एल्गार मोर्चा काढुन सुध्दा न्याय हक्क मिळाला नाहि म्हणुन दि ६,७ एप्रील २२ रोजी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे अमरण उपोषण करून न्याय मिळाला नाही,
कुंभकर्ण झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधी, प्रशासन जागे होत नसल्याने दिव्यांग जनता दल सामाजिक संघटना व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्तपणे स़स्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कु़चेलिकर, कुलकर्णी काका,ज्ञानेश्वर नवले यांच्या नेतृत्वाखाली अशा कडक उन्हात *दिव्यांग आयुक्त कार्यालय पुणे येथे दिव्यांगाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि 17 मे 2022 रोजी सकाळी 11 ते 5 पर्यत अर्ध नग्न बोम मारो धरने आंदोलन करण्यासाठी मा, मुख्यमंत्री व संबधित मंत्रीमहोदय यांना मार्फत मा दिव्यांग आयुक्त साहेब पुणे यांच्या तर्फे खालील मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

▪️दिव्यांग बांधवांच्या खालील मागण्या

1) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायदा करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्थरावर अंमल बजावणी व्हावी म्हणून ग्रामपंचायत स्थरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित करावे

२) दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी,खासदार आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्तावर भिक मांगन्याची वेळ येणार नाही
३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन्ही वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जिवन जगत असतील त्यांचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावे.

4) अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्रअंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद करुन प्रशासकिय स्थरावर अंमलबजावणी तहसिलमार्फत करण्याचे आदेश
देण्यात यावे

५) दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे संजय गांधी निराधार योजनेत निवड करावी
४) दिव्यांग बांधवाना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महानगर पालिका पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का देण्यात येत नाही न देणार्‍या अधिकारी यांच्या वर कडक कारवाई करावी

5) म. ग्रा.रो.ह.योजनेत दिव्यांगाला काम मिळेना

6) दिव्यांगाला स्वयंरोज गारासाठी जागा
गावातील शासकिय व निमशासकीय कार्यालयात व कार्यालयीन परिसरात दिव्यांगाला स्वयं रोजगारासाठी 200 स्केअर फुट जागा देण्याबाबत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात आले आहे.

7) दिव्यांग बाधवाना घरकुल योजनेत प्राधान्य म्हणून पाच टक्के प्रमाणे घरकुल देण्यासाठी शासन आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही
८) प्रत्येक जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासन प्रशासन यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व संबधितावर कार्यवाही करावी खऱ्या दिव्यांगाना न्याय. मिळत नाही
तरी मा दिव्यांग आयुक्त साहेब आमचे प्रश मंञीमहोदय यांच्या कडे मांगणी करून
आपल्या कनिष्ठ अधिकारी यांना दिव्यांग कायदाची अंमल बजावणी करण्यासाठी आदेशित करून न्याय हक्क घेण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे
असे आवाहन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ज्ञानेश्वर नवले, नागोराव बंडे पाटिल, राजुभाऊ शेरकुरवर,रंजीत पाटिल,मगदुम शेख,प्रमसिंग चंव्हाण, विठ्ठलराव बेलकर, बालाजी होनपारखे, गजानन वंहिदे,चांदू गवाले, चंद्रकांत जाधव,राहुल सोनूले,दिंगाबर लोणे,हानिफ शेख,संजय राठोड,भारतीताई जानगेनवाड, सुभद्राबाई शिंदेयशोदाबाई फैरमारे,कालिंदा मोरे,सविता नांवदे, बालाजी भेंडेकर,बालाजी गवाले,हेंमत पाटिल, हरिश्र्चंद्र पोले, गोपाळ अडबलवार,अनिल रामशेटवार आदींनी केले आहे.

Previous articleझाडे लावा झाडे जगवा
Next article. संभाजी महाराज जन्म सोहळा व छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चा ८ वा वर्धापन दिन नारशिंगे येथे उत्साहात साजरा झाला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here