Home वाशिम झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा झाडे जगवा

104
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0026.jpg

झाडे लावा झाडे जगवा                                                           अनसिंग,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन आता तरी जागे व्हा मित्रांनो मागील प्रत्येक दहा वर्षापूर्वी 35 ते 40 अंश तापमान असायच आता बघितलं तर 45 अंश तापमान पार पडलय. पुढील येणाऱ्या वर्षात 45 ते 50 अंश नंतर 60 अंश असे वाढत जाईल तेवा अशी रडायची वेळ येईल की, आहे ती झाडे सुकतील. आपला महाराष्ट्र हा वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. सर्व नागरिकांनी येत्या पावसाळ्यात आपल्या अंगणामध्ये, गावांमध्ये, मंदिर असतील तिथे व शाळेच्या परिसरामध्ये, समशान भूमी मध्ये जिथे जागा मिळेल तिथे प्रत्येक व्यक्तीने 1 जरी झाड लावल तरी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आज जी परिस्थिती दिसत आहे ती पुढे दिसणार नाही. येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावा तीन वर्ष आपल्या मुलासारखे संगोपन करा व पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला माहिती आहेच झाडांचा आपल्या जीवनाशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला मिळणारा प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन हा झाडा पासूनच मिळतो. झाडे आपल्याला आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू देतात आणि सजीवांनी सोडलेला कार्बन डाय-ऑक्साइड ते स्वतः शोसून, परत ऑक्सिजन बाहेर सोडतात. निसर्गचक्रात शुद्ध हवेची असलेली कमतरता झाडे भरून काढत असतात. मनुष्यालाच तेवढं नाही तर पृथ्वीवरील सर्व जीवांना जगण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावत असतात. झाडे ही सूर्याचा अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोकतात. या पावसाळ्यात संकल्प करूया, प्रत्येकाने एक तरी झाड लावूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here