Home गडचिरोली आरमोरी तालुक्यातील दोन व्यक्तीचा बळी घेणाऱ्या वाघास केले जेरबंद।

आरमोरी तालुक्यातील दोन व्यक्तीचा बळी घेणाऱ्या वाघास केले जेरबंद।

53
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0031.jpg

आरमोरी तालुक्यातील दोन व्यक्तीचा बळी घेणाऱ्या वाघास केले जेरबंद।
ताडोबाच्या आर आर टिम चे यश
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज) :शुक्रवार व शनिवारी सलग दोन दिवस महिला व पुरुष शेतक-यांचे बळी घेणाऱ्या ते वाघाचे शावक ट्रैंक्यूलाइज करुन जेरबंद करण्यात ताडोबा च्या आर आर टि टिम ला सोमवारी रात्री यश आले आहे.
शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी त्याचे एवजी गेलेल्या महिला शेतकर्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. या घटनेची शाही वाळण्याच्या आत 24 तासात घडलेल्या दुसऱ्या घटनेत अरसोडापासुन एक ते दिड किमी अंतरावर आरमोरी शहरानजीक वडसा मार्गावर कोसा प्रकल्पाजवळ शनिवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी शेतावर गेलेल्या नंदू गोपाळा मैश्राम वय (50) आरमोरी या शेतक-यांवर वाघाने हल्ला चढवुन त्यास ठार केले आहे.
या घटनेनंतर परिसरात तिव्र आक्रोश निमार्ण झाला होता.वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी रविवारी सुटि असतांना देखील सतप्तं नागरिकांचा सर्वपक्षीय .मोर्चा वनविभागावर काढण्यात आला.रविवारी लगेच ताडोबा अंधारी वाघ्र प्रल्पातील शार्पसूटर नव जणांची टिम या क्षेत्रात तैनात करण्यात आली.त्यांनी 24 तासात नियोजन बध्द कार्यक्रम राबवित सोमवारी रात्री साळेआठ ते 9 वाजता च्या सुमारात वाघाच्या बछळ्यास ट्रैंक्यूलाइज करित यशस्विपणे जेरबंद केले आहे.हा बछडा साधारण सोळा ते अठरा महिण्याचा असल्यांचे समजते तो नुकताच शीकार करण्यास शीकला असल्यामुळे अनियंञीत पध्दतीने शीकार करणे सुरु केले असल्याची माहिती सुञानी दिली आहे. हि कामगीरी यशस्वी करण्यासाठी डॉ रविकिरण खोब्रागडे, अजय मराठे,अतुल महुले,भोजराज दांडेकर,अमोल तिखत,सुनिल नन्नावरे,अमोल कोरपे,अक्षय दांडेकर,संपोष तिजारे,आणी मन्नान शेख यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleसंकटात सपडलेल्या चांभार्डा येथील शेतकऱ्यास शिवसेनेचा मदतिचा हात
Next articleझाडे लावा झाडे जगवा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here