Home गडचिरोली संकटात सपडलेल्या चांभार्डा येथील शेतकऱ्यास शिवसेनेचा मदतिचा हात

संकटात सपडलेल्या चांभार्डा येथील शेतकऱ्यास शिवसेनेचा मदतिचा हात

111
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220516-WA0028.jpg

संकटात सपडलेल्या चांभार्डा येथील शेतकऱ्यास शिवसेनेचा मदतिचा हात

शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा येथील शेतकरी शामराव सुरकर यांच्या दुधाळू गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार केले. त्यामुळे सुरकर यांचा दुग्धव्यवसाय बंद पडला. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सुरकर यांच्या दुग्धव्यवसायाचे साधन वाघाने हिरावून घेतल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले.संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली. शेतकरी शामराव सुरकर हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळू गायी खरेदी केली होती. दुग्धव्यवसायामुळे कुटुंबाचा गाडा सुरळीत चालत होता.त्यांनी आपली दुधाळू गाय नेहमीप्रमाणे गाव परिसरात चरण्यासाठी सोडली.गाय गावालगत असलेल्या चांभार्डा गावाला लागून असलेल्या टेंभा येथील शेतकरी सुभाष करंडे यांच्या शेतात चरत असतांना शेतालगत असलेल्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने सुरकर यांच्या गायीवर हल्ला करून ठार केले. ज्या गायी च्या दुधावर कुटुंबाचा उदरनिवार्ह होता ती गाय वाघाने ठार मारल्याने चांभार्डा येथील शेतकरी सुरकर यांच्यावर संकट कोसळले.चांभार्डा येथील शिवसैनिकानी शेतकऱ्यावर ओढावलेल्या संकटाची माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांना दिली. शिवसेनेच्या ८०टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण याचा प्रत्यय देत चांभार्डा येथील गरीब शेतकरी शामराव सुरकर यांच्या घरी जाऊन शिवसैनिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत दिली. शासनाकडून वनविभागाच्या वतीने देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी याप्रसंगी दिले.चांभार्डा येथील शेतकरी शामराव सुरकर यांना आर्थिक मदत देतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री,अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, राहुल सोरते,अरुण बरपात्रे, निकेश लोहबरे,संजय शेंडे,स्वप्निल खांडरे,सरपंच सुरज उईके,उपसरपंच संदीप आलबनकर, गजानन आजबले,महादेव हजारे,विनायक चनेकार, उमाजी लाजूरकार,महेश लाजूरकार,विठ्ठल पाल, गंगाधर मसराम,प्रल्हाद कोटगले,उमाजी चनेकार, सुरेश कोलते,धर्माजी सुरकर,भास्कर सुरकर, रामदास ठाकूर,खुशाल मेश्राम,विनोद चनेकार, आदित्य सेलोकर,पंकज चनेकार,दयाराम चापले,अनिल लडके, आनंदराव लाजूरकार यांच्या सह गावातील शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते

Previous articleनक्षल्यांनी केली वाहनांची जाळपोळ।
Next articleआरमोरी तालुक्यातील दोन व्यक्तीचा बळी घेणाऱ्या वाघास केले जेरबंद।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here