• Home
  • *अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत*

*अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत*

*अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत* राहुरी,(प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) – राहुरी तालुक्यात व परिसरात काल रात्री व आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला आहे, सतत दोन दिवस चालना ऱ्या या संतत धार पावसामुळे हवेत मोठया प्रमाणात गारवा निर्माण होऊन आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे,परंतु सध्या कोरोना आजाराचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता, नागरिक दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण ,पावसाळी हवामानामुळे आपण आजारी पडतोय ,परंतु डॉक्टरांना कोरोनाचा संशय येऊन आपणास उपचाराकरिता covid सेंटर ला पाठवतील या भीतीपोटी लोक दवाखान्यात जाण्याचे टाळत आहेत,काल पासून या संतत धार पावसाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा, गुहा,कनगर, वांबोरी, सोनगाव , मांजरी पाने गाव ,डिग्रस, गुंजळे, कात्रड, मानोरी,धामोरी, सडे, उंबरे, व तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्याला पावसाने घेरले आहे, अति पावसामुळे मुळा धरण पातळी ओलांडू पाहत असून मुळा धरण व परिससतील नागरिकांनी सतर्क राहावे असा धोक्याचा इशारा देण्यात आला आहे,या संतत धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, काय म्हणावे या निसर्गाला असे उदगार प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत आहेत, या अति वृष्टीमुळे प्रत्येक गावात व परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे, त्या मुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी चरच्या परिसरात सुरू आहे

anews Banner

Leave A Comment