Home नाशिक लासलगाव सह पंचक्रोशीतील वारक-यांसाठी माऊली चे मंदिर म्हणजे आळंदी ची जणु पर्वणीच...

लासलगाव सह पंचक्रोशीतील वारक-यांसाठी माऊली चे मंदिर म्हणजे आळंदी ची जणु पर्वणीच —

102
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_073956.jpg

लासलगाव सह पंचक्रोशीतील वारक-यांसाठी माऊली चे मंदिर म्हणजे आळंदी ची जणु पर्वणीच —

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

लासलगाव येथील श्री ज्ञानेश्वर माऊली मंदीरात गुरुवार २२ रोजी प्रथम वर्धापन दिनानिमित्त ब्राह्मण सेवा मंडळाचे विश्वस्त खजिनदार शेखर कुलकर्णी, ब्राह्मण महासंघ विश्वस्त सौ स्मिता कुलकर्णी तसेच डॉ गिरीश कुलकर्णी मैत्रेयी महिला मंडळ सदस्य सौ रेणुका कुलकर्णी यांच्या हस्ते माऊलींच्या मूर्तीला षोडोपचार महाअभिषेक करण्यात आला. नंतर महाआरती व प्रसाद वाटप करण्यात आला.
लासलगाव येथील माऊलींचे मंदिर पंचक्रोशीतील भाविकांसाठी जणु आळंदी ची पर्वणीच आहे असे अध्यात्मिक विचार ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी यांनी केले आहे.
एक स्वप्न हृदयात पाहिलेलं वर्ष पूर्तीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवा कार्याचा आनंद साजरा करताना मन गहिवरलेलं.श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर लासलगाव प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. साधारण वर्षभरा पूर्वी संतांचीया भेटीलागी संत अवतरले या भूमंडळी.. या ओवी नुसार परमपूज्य भगरी बाबांच्या पावन स्पर्शाने पुण्यभूमी लासलगाव नगरीत ब्राह्मण सेवा मंडळाच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज, भगवान परशुराम, समर्थ रामदास स्वामी यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. पंचक्रोशीतील वारकऱ्यांसाठी माऊलींचे मंदिर म्हणजे आळंदीची जणु पर्वणी आहे. वारकरी धर्माची पताका हातात घेत संस्कारक्षम कार्यक्रम मंदिरात होत असतात. भजन, नित्य पूजापाठ, आरती, हनुमान चालीसा,परिसरातील वृक्षारोपण, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी धार्मिक, सामाजिक अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात.
वर्धापन दिनाचे औचित्य साधत सेवा ही सत्कर्म भावना जपत विंचूर येथील अविनाश दुसाने फाउंडेशनच्या वतीने मंदिराला आसन व्यवस्था म्हणून उत्कृष्ट प्रतीचे बाक(बाकडे) देण्यात आले या सेवेसाठी श्री अविनाश दुसाने धनसंपदा पतसंस्था चेअरमन तसेच जि प शाळेचे शिक्षक दिलीप कोथमीरे सर यांचे मंडळाच्या वतीने ऋणनिर्देश व्यक्त करण्यात आले. सौ स्मिताताई कुलकर्णी व ऋषिकेश जोशी यांचे या कार्यास सहकार्य लाभले. यावेळी ब्राह्मण सेवा मंडळ विश्वस्त सचिव दिलीप कुलकर्णी ,आतिश कुलकर्णी, दिनेश जोशी, मंडळ सदस्य राजेंद्र कुलकर्णी ,दीपक कुलकर्णी ,शेखर दशपुत्रे, मंदिर व्यवस्थापक सुशील जोशी, नंदकुमार भंडारी उपस्थित होते. तसेच ब्राह्मण सेवा मंडळ अध्यक्ष विजय जोशी,गणेश जोशी यांचे बहुमोल सहकार्य लाभले. मैत्रेयी महिला मंडळ उपाध्यक्ष स्वाती जोशी, ब्राह्मण महासंघ जिल्हा उपाध्यक्ष तथा मैत्रेयी मंडळ कार्याध्यक्ष अक्षदा जोशी, सह कार्याध्यक्ष रजनी कुलकर्णी, उपाध्यक्ष प्राजक्ता भंडारी, चिटणीस तृप्ती केंगे, जयश्री दशपुत्रे, आवर्तन भंडारी व इतर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात बारावीच्या परीक्षा सुरळीत.
Next articleRCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here