• Home
  • अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण:उपचारांना तात्काळ सुरवात

अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण:उपचारांना तात्काळ सुरवात

  • ⭕अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण:उपचारांना तात्काळ सुरवात⭕
    नांदेड 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठक तसेच इतर कामांसाठी अशोक चव्हाण यांचा नांदेड ते मुंबई हा प्रवास सतत सुरुच होता. या प्रवासादरम्यानच त्यांना बाधा झाल्याचं पीटीआय सूत्रांकडून समोर आलं आहे. अशोक चव्हाण हे ६१ वर्षांचे असून २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा आली होती. जवळपास २ वर्षं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविलं आहे…

anews Banner

Leave A Comment