⭕’कोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे ???.⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई :- कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून सुरु असणाऱ्या लुटीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित रुग्णालयाने नातेवाईकांच्या हातात आठ लाख रुपयांचे बिल ठेवले. मुळात कोरोनावर औषधच अस्तित्त्वात नसेल तर मग खासगी रुग्णालये अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा दर कसा आकारु शकतात, असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. आठ दिवसांपूर्वी कोणतेही रुग्णालय या महिलेवर उपचार करायला तयार नव्हते. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला या रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तीन लाख रुपये भरण्यास सांगितले. सरकारने असे प्रकार रोखले पाहिजेत, असे यावेळी आठवले यांनी म्हटले.
