Home कृषिसंपदा मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचे फेर सर्वेक्षण झालयाने शेतकऱ्यांचा फायदा

मुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचे फेर सर्वेक्षण झालयाने शेतकऱ्यांचा फायदा

55
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0046.jpg

 

आ. डॉ. तुषार राठोड यांनी माहिती दिली.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यात अतिवृष्टीचे सर्वेक्षण झाले असून महसूल विभागाने फेर सर्वेक्षण करावे अशी मागणी झालेल्या चुकीचे आ. डॉ . तुषार राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . त्यानुसार महसूल विभागाने फेर सर्वेक्षण करून तालुक्यातील ५१.८२ टक्के बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती आ. डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली . विभागाकडून मुखेड तालुक्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचा महसूल विभाग प्रारंभिक सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये केवळ ६२५ शेतकऱ्याची ६४५ हेक्टर जमीनीवरील पिके बाधित झाल्याचे सांगण्यात आले होते . याबाबत समाज माध्यमांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आ. डॉ . राठोड यांनी महसूल विभागाला याबाबत जाब विचारला होता आणि फेर सर्वेक्षणाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती . त्यानुसार शासनाच्या कृषी विभाग महसूल विभाग आणि पंचायत विभागाने संयुक्त सर्वे क्षण करून एक अहवाल तयार केला या अहवालात मुखेड तालुक्यातील जमिनीवरील पिके अतिवृष्टीने बाधीत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे सदर सर्वेक्षणाला थेर पडताळणी धर्माबाद येथील तहसीलदार आणि त्यांच्या टीमने केली होती . सदर अहवाल काल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आला आहे यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आ या अहवालावर एनडीआरएफच्या शासनाकडून निकषांच्या मदती पेक्षा दुप्पट मदत करण्याची घोषणा राज्य शासनाने केली असून हेक्टरी १३ हजार ६०० रुपये मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे या निर्णयाचा फायदा मुखेड तालुक्यातील ५१ टक्के शेतकऱ्यांना होणार असल्याची माहितीही आ. डॉ. तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल राव पाटील उमरदरीकर पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाटील , उपसभापती मनोज गोंड, राजू घोडके, भाजपाचे शहराध्यक्ष किशोरसिंह चौव्हाण , भाजपाचे कार्यकर्ते गणेश पाटील जाधव , बालाजी शिंदे पाटील बिल्लाळीकर , व्यंकटराव लोहबंदे , कमलाकर आगदे , सुधीर चव्हाण, आदी उपस्थित होते .

Previous articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप.
Next articleकेंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here