Home महाराष्ट्र केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना...

केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

59
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220821-WA0043.jpg

केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 20 :- केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, महाविद्यालयीन व विद्यापिठातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना या तीन योजनेची अंमलबजावणी उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येतात. सन 2022-23 साठी या योजनेसाठी केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरुन 20 जुलै 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. विद्यार्थ्याना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतीम मुदत 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंत तर महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करण्याचा अंतीम दिनांक 15 नोव्हेंबर 2022 हा आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारशी व जैन या अल्पसंख्यांक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी केंद्रशासन पुरस्कृत मॅट्रिकोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. शिष्यवृत्तीसाठी वर्ग 11 ते पीएचडी व्यावसायिक डी.एड्., बी.ए., एम.एड्., आय.टी.आय., सर्व डिप्लोमा व अकरावी/बारावी स्तरांवरील एम.सी.व्ही.सी. अभ्यासक्रम (तंत्र शिक्षण विभागातील व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम यादीतील अभ्यासक्रम सोडून) इतर सर्व अभ्यासक्रमांचे विद्यार्थी पात्र आहेत. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा अधिक नसावे.

महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना केंद्र शासनामार्फत नवीन शिष्यवृत्तीसाठी / नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज शिष्यवृत्ती पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी आहे. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 4 लाख 50 हजारापेक्षा अधिक नसावे.

महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना वर्ग 11 वी, 12वी, पोस्ट मॅट्रिक डिप्लोमा / सर्टिफिकेट पदवी, पदव्युत्तर डिग्री / डिप्लोमा तसेच डिप्लोमा व सर्टिफिकेट या अभ्यासक्रमासाठी देण्यात येते. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा अधिक नसावे.

सर्व महाविद्यालयांनी त्यांची केवायसी व आधार डेमो ऑथेटिंफीकेशन व स्वत:ची नोंदणी चालू वर्षात करावी नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलवर नोंदणी करावी. शिष्यवृत्ती योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार पात्र व इच्छुक विद्यार्थ्यानी नवीन मंजूरीसाठी व नूतनीकरणासाठीचे अर्ज www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. नॅशनल स्कॉलरशिप (एनएसपी) या मोबाईल ॲपवर अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. या योजनेबाबत लाभ पात्रता व स्वरुप याबाबतची माहिती संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनएसपी पोर्टलवरील पात्र शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) नांदेड विभाग, नांदेड कार्यालयाने केले आहे.

Previous articleमुखेड तालुक्यातील अतिवृष्टीचे फेर सर्वेक्षण झालयाने शेतकऱ्यांचा फायदा
Next articleगणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here