Home Breaking News 🛑 सॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु 🛑

🛑 सॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु 🛑

100
0

🛑 सॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 2 ऑक्टोबर : ⭕ Samsung Galaxy A3 Core ला आफ्रिकेत लाँच करण्यात आले आहे. सॅमसंगचा हा फोन अँड्रॉयड गो एडिशन सोबत येतो. यात गुगल गो एडिशन अॅप्स इन्स्टॉल येतात. सॅमसंगचा हा नवीन एन्ट्री लेवल स्मार्टफोन मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए २ कोर चे अपग्रेड व्हेरियंट आहे. फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली आहे.

Samsung Nigeria च्या ट्विटर हँडलच्या माहितीनुसार, गॅलेक्सी ए३ कोर 32,500 NGN (जवळपास ६ हजार २०० रुपये) खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोनला नायजेरियात सॅमसंग स्टोर्स आणि पार्टनर स्टोर्सवर खरेदी करता येवू शकतो. हा फोन ब्लू, रेड आणि ब्लॅक कलरमध्ये येतो.

ड्यूल सिमच्या या फोनमध्ये ५.३ इंचाचा एचडी प्लस (720×1480 पिक्सल) टीएफटी एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये वरच्या भागात व खालच्या भागात मोठे बेजल दिले आहेत. हँडसेटमध्ये क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. परंतु, कंपनीने अद्याप या प्रोसेसरचे नाव जाहीर केले नाही. या फोनमध्ये १ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

सॅमसंगचा हा फोन अँड्रॉयड गोवर चालतो. यात गुगल गो एडिशन अॅप्स आधीच इन्स्टॉल करण्यात आले आहेत. या फोनध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश सोबत येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. सॅमसंगचा दावा आहे की, रियर कॅमेरा ४ एक्स पर्यंत डिजिटल झूमसोबत येतो. तसेच ३० फ्रेम प्रति सेकंदावर फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते.

सॅमसंगच्या या फोनमध्ये रियर टेक्स्चरयुक्त पॉलीकॉर्बोनेटचे बटन दिले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 3000mAh बॅटरी दिली आहे. फोनमध्ये वायफाय, यूएसबी चार्जिंग सपोर्ट करते.⭕

Previous article🛑 मराठा संघटना आक्रमक….! MPSC परीक्षा घेतल्यास, परीक्षा केंद्र फोडू 🛑
Next article🛑 केंद्र सरकारच्या उच्च शिक्षणसंस्थांसाठी गाइडलाइन्स 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here