• Home
  • 🛑 मराठा संघटना आक्रमक….! MPSC परीक्षा घेतल्यास, परीक्षा केंद्र फोडू 🛑

🛑 मराठा संघटना आक्रमक….! MPSC परीक्षा घेतल्यास, परीक्षा केंद्र फोडू 🛑

🛑 मराठा संघटना आक्रमक….! MPSC परीक्षा घेतल्यास, परीक्षा केंद्र फोडू 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕मराठा आरक्षण प्रश्नी निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करतानाच जबरदस्तीने परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडू, असा इशारा मराठा समाजाचे नेते आबा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर केली आहे. या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करताना आबा पाटील म्हणाले, राज्य सरकारने पाच ऑक्टोबरपर्यंत यासंदर्भात निर्णय घ्यावा. आम्ही त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देत आहोत. या काळात निर्णय घेतला नाही तर सहा तारखेला मुंबईत मातोश्रीसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

ते म्हणाले, या परीक्षा पुढे न ढकलता जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर परीक्षा केंद्र फोडण्यात येईल असा इशारा देताना ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मातोश्रीतून बाहेर पडण्याची गरज आहे.

मराठा समाजाशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य लक्षात येणार आहे…..⭕

anews Banner

Leave A Comment