• Home
  • मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210211-WA0102.jpg

मराठी नायिका ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण

मुंबई : मराठी चित्रपटाचे प्रसिध्द अभिनेते अशोक सराफ यांच्या धुमधडाका या मराठी चित्रपटात नायिकेचे काम करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांची आर्थिक मदतीसाठी वणवण सुरू आहे. औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी त्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर मदत गोळा करत आहेत. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलेल्या ऐश्वर्या राणे या आता ओळखताही येणार नाहीत अशा अवस्थेत आहेत. राज्य शासनाकडे वारंवार मदत मागण्याची माझी इच्छा नाही, पण त्यांनी माझी अवस्था पाहून मदत करणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या. त्या पुढे मुंबादेवी, महालक्ष्मी, शिर्डी, बाबुलनाथ अशा विविध मंदिरांबाहेर जाऊन आर्थिक मदत जमा करणार आहेत.
ऐश्वर्या राणे या सिंधुदुर्गमधील त्यांच्या गावच्या दिशेने निघाल्या होत्या. मात्र लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. या प्रवासात त्यांचे कपडे आणि इतर सामानही चोरीला गेले होते. त्यावेळी खासदार रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या स्वतःच्या घरात आसरा दिला होता.
मर्द’ या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ऐश्वर्या राणे यांचा अपघात झाला होता. घोडेस्वारी करताना त्या पडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त दुखापत झाली होती. त्यानंतर त्या उपचारासाठी परदेशीही गेल्या होत्या. मात्र उपचाराचा खर्च त्यांना पुढे परवडेनासा झाला. ऐश्वर्या राणे यांचं घर, दागिने, थोडेफार जमा केलेले पैसे उपचारासाठीच गेले. तेव्हापासून त्या सिनेसृष्टीपासून दुरावल्या.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment