• Home
  • शिवजयंती साध्यापद्धतीने साजरी करा, ठाकरे सरकार

शिवजयंती साध्यापद्धतीने साजरी करा, ठाकरे सरकार

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210211-WA0103.jpg

शिवजयंती साध्यापद्धतीने साजरी करा, ठाकरे सरकार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजीमहाराजांची जंयती साध्यापद्धतीने साजरी केली जाणार आहे. कोरोना महामारीच्या संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन .
१)यावर्षी गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
२)सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
३)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी घातली आहे.
४)छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment