Home कोकण केरळ—केरळ मध्ये तोक्ते चक्रीवादळ ला सुरुवात झाली असून समुद्राचे पाणी आता नागरी...

केरळ—केरळ मध्ये तोक्ते चक्रीवादळ ला सुरुवात झाली असून समुद्राचे पाणी आता नागरी वस्तीत शिरले आहे

233
0

राजेंद्र पाटील राऊत

केरळ—केरळ मध्ये तोक्ते चक्रीवादळ ला सुरुवात झाली असून समुद्राचे पाणी आता नागरी वस्तीत शिरले आहे

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 15 व 16 मे रोजी ऑरेंज अलर्ट                                            पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा येथील प्रादेशिक वेधशाळेतर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी दिनांक 15 मे 2021 आणि दिनांक 16 मे 2021 या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

या काळात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तौंते वादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार , कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे.

पुढील २४ तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे.

या वादळाचं नाव तौंते असं आहे. १५,१६ आणि १७ तारखेला या वादळाचा प्रभाव दिसेल.

कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच १६ आणि १७ तारखेला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसेल अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे.
चक्रीवादळ तौंते हे शनिवार सकाळपर्यंत त्याच भागात असेल. त्यानंतर रविवारी (१६ मे) चक्रीवादळामध्ये तीव्रता येईल.

यामुळे देशाच्या दक्षिणेकडील भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळात वेगाने होणारी वाढ लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) महाराष्ट्र व गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Previous articleरत्नागिरीत मुसळधार पाऊसाला सुरुवात
Next articleभारतीय मराठा महासंघ नांदेड जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी शिवाजी पा जाधव सातेगावकर यांची निवड..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here