Home नांदेड भारतीय मराठा महासंघ नांदेड जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी शिवाजी पा जाधव सातेगावकर...

भारतीय मराठा महासंघ नांदेड जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी शिवाजी पा जाधव सातेगावकर यांची निवड..

152
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय मराठा महासंघ नांदेड जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदी शिवाजी पा जाधव सातेगावकर यांची निवड..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भारतीय मराठा महासंघाची बैठक होटाळा ता. नायगाव येथे प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात शिवाजी जाधव सातेगाव यांची भारतीय मराठा महासंघाच्या नांदेड ग्रामीण जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे व नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र शिवाजी जाधव यांना देण्यात आले.
शिवाजी जाधव गेल्या काही वर्षापासून सामाजिक काम करित असून त्याच्यामुळे मराठा महासंघाचे काम ग्रामीण भागात वाढेल असा आशावाद जयदीप दादा वरखिंडे यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भारतीय मराठा महासंघाचे नायगाव ता. अध्यक्ष परमेश्वर जाधव,देगलूर ता उपाध्यक्ष बालाजी पांचारे, खानापूर सर्कल प्रमुख बाबाराव कदम,साईनाथ कानोले ,बालाजी पाटील होटाळकर, शिवाजी पाटील होटाळकर, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here