राजेंद्र पाटील राऊत
रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागात जोरदार वादळी वाऱ्या सह पाऊस सुरू झाला आहे अनेक ठिकाणी वीज प्रवाह खंडित झाला आहे.
(युवा मराठा न्युज नेटवर्क ब्युरो टिम)
♦️अरबी समुद्रात घोंघावणारे ‘तौत्के’ चक्रीवादळ (Tauktae Cyclone) अधिक सक्रीय झाले आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. लक्षद्वीपजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. येत्या 12 तासात चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
♦️दरम्यान रत्नागिरीत सध्या कडाक्याची वीज आणि वादळ सदृश्य परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.याच जास्त प्रमाण जिल्ह्यातील दक्षिण भागात आहे. हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे