Home रत्नागिरी सागरी सीमा मंच आयोजित सागर किनारे स्वच्छता अभियान सर्वांच्या सहभागातून यशस्वी करूया-...

सागरी सीमा मंच आयोजित सागर किनारे स्वच्छता अभियान सर्वांच्या सहभागातून यशस्वी करूया- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

109
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0033.jpg

सागरी सीमा मंच आयोजित सागर किनारे स्वच्छता अभियान सर्वांच्या सहभागातून यशस्वी करूया- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियानाचे 17 सप्टेंबरला रत्नागिरी आयोजन करण्यात येत असून सागरी सीमा मंच माध्यमातून जिल्हा प्रशासन, सर्व विभाग यांच्या सहयोगातून आणि नागरिकांच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आज जिल्हाधकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सागरी किनारे स्वच्छता अभियान नियोजनांसदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), तहसीलदार तेजस्वीनी पाटील, आदि संबधित विभागाचे अधिकारी तसेच सीमा जागरण मंचाचे (दिल्ली) अखिल भारतीय सहसंयोजक मुरलीधर भिंडा, सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी, अमर पावशे, स्वप्नील सावंत ,डॉ. प्रशांत अंडगे आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बी.एन. पाटील यांनी अभियाना अनुषंगाने सर्व विभागांना सूचना दिल्या. या अभियानात रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान भरीव असावे, कोणतीही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे सांगितले.

दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यक्रम जयगड ते जैतापूर (माडबन) पर्यंत होणार आहे. यामध्ये 1) नांदीवडे बीच 2) मालगुंड बीच 3) गणपतीपुळे बीच (3मोठे कार्यक्रम),4) आरे बीच 5) काळबादेवी बीच6) मिर्‍या बीच7) पांढरा समुद्र 8) मांडवी बीच (मोठा कार्यक्रम) 9) भाट्ये बीच (मोठा कार्यक्रम)10) कसोप बीच 11) कुर्ली बीच 12) वायंगणी बीच13) रनपार बीच14) गणेशगुळे बीच15) पूर्णगड बीच16) गावखडी बीच17) वेत्ये बीच 18) अंबोळगड बीच19) जैतापुर बीच20) साखरी नाट्ये येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.

उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात 1) वेसवी, 2) बाणकोट, 3)उंबरशेत, 4) उटंबर, 5) आडे, 6) लखडतर 7) हर्णे-पाज, 8) लाडघर,9) लखडतर वाडी, 10) बुरोंडी, 11) दाभोळ, 12) तरीबंदर, 13) वेलदुर, 14) असगोली, 15) पालशेत, 16) बुधल, 17) बोर्‍या, 19) कोंडकारूळ, 20) वेळणेश्वर, 21) साखरी आगर, 22) हेदवतड, 23) काताळे नवानगर 24) कुडली येथे होणार आहे.

Previous articleआरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा मंत्रालयाच्या छतावरून आत्महत्येचा प्रयत्न
Next articleबँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागातर्फे रत्नागिरीमध्ये रिटेल एक्सपोचे आयोजन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here