Home रत्नागिरी बँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागातर्फे रत्नागिरीमध्ये रिटेल एक्सपोचे आयोजन..

बँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागातर्फे रत्नागिरीमध्ये रिटेल एक्सपोचे आयोजन..

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0032.jpg

बँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागातर्फे रत्नागिरीमध्ये रिटेल एक्सपोचे आयोजन..                                   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय गोवा यांच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी हॉटेल मथुरा येथे रिटेल एक्सपो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रत्नागिरी आणि परिसरातील ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला. ग्राहकांना विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, निवृती धारकांसाठी आधारकर्ज, सोनेतारण कर्ज इत्यादी योजनांविषयी माहिती देण्यात आली. तसेच याच कार्यक्रमात कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थींना कर्जमंजुरी पत्रे देण्यात आली. क्षत्रिय व्यवस्थापक माननीय श्री आनंद शंकर यांच्या हस्ते या एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. उप क्षेत्रीय प्रबंधक श्री आनंद डिंगणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्य प्रबंधक श्री विक्रम गोंधळी आणि श्री धीरज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी श्री आयुष, श्री सुजित यांनी विविध योजनांची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र शहर परिसरातील कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय गोवा यांच्या वतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी हॉटेल मथुरा येथे रिटेल एक्सपो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रत्नागिरी आणि परिसरातील ग्राहकांचा मेळावा घेण्यात आला. ग्राहकांना विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये गृह कर्ज, वाहन कर्ज, निवृती धारकांसाठी आधारकर्ज,सोनेतारण कर्ज इत्यादी योजनांविषयी माहिती देण्यात आली. तसेच याच कार्यक्रमात कर्ज मंजूर झालेल्या लाभार्थींना कर्जमंजुरी पत्रे देण्यात आली. क्षेत्रिय व्यवस्थापक माननीय श्री आनंद शंकर यांच्या हस्ते या एक्सपोचे उद्घाटन करण्यात आले. उप क्षेत्रीय प्रबंधक श्री आनंद डिंगणकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्य प्रबंधक श्री विक्रम गोंधळी आणि श्री धीरज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. क्षेत्रीय कार्यालयामधील अधिकारी श्री आयुष, श्री सुजित यांनी विविध योजनांची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्र शहर परिसरातील कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

क्षेत्रिय व्यवस्थापक श्री आनंद शंकर यांनी विशेष कालावधीमध्ये या योजनांचा फायदा घेण्याविषयी ग्राहकांना आवाहन केले, तसेच ग्राहकांना योग्य कालावधीत उत्तम सेवा देण्याविषयी बँक कटिबद्ध असल्याचे नमूद केले..
आज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र व्यवसाय वृद्धी च्या बाबतीत अग्रेसर आहे, ग्राहकांनी बँकेच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here