Home Breaking News प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान भाजप आमदाराला हैदराबादमध्ये अटक

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान भाजप आमदाराला हैदराबादमध्ये अटक

150

आशाताई बच्छाव

IMG-20220824-WA0031.jpg

प्रेषित मोहम्मद पैगंबरांबद्दल वादग्रस्त विधान भाजप आमदाराला हैदराबादमध्ये अटक                             हैद्राबाद,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. राजा यांनी केलेल्या वक्तव्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हैदराबाद शहरात सोमवारी रात्री जमावाने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत राजा यांच्या अटकेची मागणी केली होती. यामुळे शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनानंतर मंगळवारी सकाळी टी. राजा सिंह यांना अटक करण्यात आल्याचे उपायुक्त पी. साई. चैतन्य यांनी सांगितले.

सोबतच आता भाजपनेदेखील टी. राजा सिंह यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावर कारवाई करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. श्री राम चॅनेल तेलंगण नावाच्या युट्यूब चॅनेलवरून फारुकी के आँख का इतिहास सुनिये’ या नावाने राजा यांनी सोमवारी हा वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या संदर्भातून टी. राजा यांनी फारुकीच्या कॉमेडी शोवर टीका केली. शर्मा यांचे थेट नाव न घेता राजा वादग्रस्त विधानांचा उल्लेख करताना व्हिडीओत दिसत आहेत.

Previous articleबँक ऑफ महाराष्ट्र गोवा विभागातर्फे रत्नागिरीमध्ये रिटेल एक्सपोचे आयोजन..
Next articleमुंबई विद्यापीठ अंतर्गत युवा महोत्सवात लोकनेते शामरावजी पेजे महाविद्यालयाची बाजी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.