Home पुणे दापोडीतील सामान्य कुटुंबातील धम्मरत्नने बौद्धिक यांनी केले विशेष कौतुक

दापोडीतील सामान्य कुटुंबातील धम्मरत्नने बौद्धिक यांनी केले विशेष कौतुक

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0074.jpg

दापोडीतील सामान्य कुटुंबातील धम्मरत्नने बौद्धिक यांनी केले विशेष कौतुक                                       पिंपरी चिंचवड-प्रतिनिधी उमेश पाटील
जपान येथे शिक्षण घेण्यासाठी तब्बल ९२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळालेल्या दापोडी येथील धम्मरत्न गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्याचा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी संविधानाची प्रत देऊन सत्कार केला. तसेच त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून स्वतः यशस्वी होण्यासोबतच पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी शंकर जगताप यांनी धम्मरत्नला शुभेच्छा दिल्या.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंघोळकर, महेश जगताप, सोमनाथ काटे, गणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य संजय मराठे, शिवाजी कदम, अनिल कांबळे, धम्मरत्न गायकवाड यांची आई निता देविदास गायकवाड, वैशाली खरात, कल्पना शिंदे, संगिता डिखळे, ज्योती कोळी, सुनिता कुवर, स्वाती गुरव, मनिषा हंगरगे, वैशाली घाडगे आदी उपस्थित होते.

दापोडी येथे एका सर्वसामान्य कुटुंबात राहणारा धम्मरत्न गायकवाड हा विद्यार्थी संपूर्ण जपानमध्ये पुढील शिक्षणासाठी ९२ लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा भारतातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेचे विशेष कौतुक आहे. त्याने मिळवलेल्या या शिष्यवृत्तीमुळे पिंपरी-चिंचवडच्या बौद्धिक क्षेत्रातही एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी धम्मरत्नचे विशेष कौतुक केले. त्याला भारतीय संविधानाची प्रत देऊन शाब्बासकी दिली. त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर पिंपरी-चिंचवडचे नाव जागतिक पातळीवर गेल्याने शंकर जगताप यांनी धम्मरत्नचे विशेष आभार मानले. तसेच जपानमध्ये शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मदत करण्याचे शंकर जगताप यांनी धम्मरत्नला वचन दिले

Previous articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिंतूर शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली
Next articleपिंपरी चिंचवड शहर कार्यालय दापोडी भागात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वज वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here