Home सामाजिक गणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन

गणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन

60
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

ganesh_chaturthi_2021_rules_to_follow_if_you_are_bringing_bappa_home.jpg

गणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 20 :- गणेश चतुर्थीसाठी गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्याचा परवाना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्यावतीने 22 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत रविवार व शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत देण्यात येणार आहे. सर्व गणेश मंडळांनी परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन नांदेडचे धर्मादाय उपआयुक्त किशोर मसने यांनी केले आहे.

गणेश मंडळांना ही परवानगी ऑनलाईन / ऑफलाईन पद्धती देण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणीसाठी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन परवाना मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.

परवान्यासाठी सर्व सभासदांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, दुरध्वनी क्रमांक, जागा मालकाची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र, गणेश मंडळ स्थापनेबाबत ठराव, मागील वर्षी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासाठी परवानगी घेतली असले तर गेल्या वर्षाचा अधिकृत लेखा परिक्षकामार्फत जमा खर्चाचा हिशोब या कागदपत्रांची आवश्यकता आहे, असेही आवाहन धर्मादाय उप आयुक्त, नांदेड विभाग, नांदेड यांनी केले आहे.

Previous articleकेंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा ; उच्च शिक्षण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन
Next articleगणेश मंडळांना वर्गणीसाठी परवाना घेण्याचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here