Home मुंबई RCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन

RCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन

330
0

आशाताई बच्छाव

IMG_20240223_074254.jpg

RCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन
युवा मराठा न्यूज
सविता तावरे- मुंबई स्पेशल रीपोर्टर
RCF ट्रॉम्बे युनिटचे ३१वे वार्षिक QC अधिवेशन 21 फेब्रुवारी 2024 रोजी गंगाधर देशमुख हॉल, RCF कॉलनी, चेंबूर, मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. 16 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व-अधिवेशन सादरीकरण आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 82 क्र. QC / LQC संघांनी त्यांचे केस स्टडीज पाच वेगवेगळ्या हॉलमध्ये नियोजित वेळेसह सादर केले. QCFI मुंबई चॅप्टरच्या तज्ञ न्यायाधीशांद्वारे या केस स्टडीचे मूल्यमापन करण्यात आले.

संमेलनाचे उद्घाटन 21 फेब्रुवारी 2024 रोजी मा. सी एम डी श्री. एस सी मुडगेरीकर सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सी एम डी श्री. एस सी मुडगेरीकर सर सोबत श्री. के बी भारती, उपाध्यक्ष QCFI आणि अध्यक्ष QCFI मुंबई चॅप्टर, श्रीमती. नजहत शेख, डी(एफ), श्रीमती. रितू गोस्वामी, डी(टी), श्री. दीपक मणी तिवारी, सी आय एस एफ कमांडंट, श्री. अनिल कुमार श्रीवास्तव, ई डी (ट्रॉम्बे); श्री. अनिरुद्ध खाडिलकर, ई डी (थळ) तिथे एकत्र होते. त्यानंतर क्यूसी गीत गायन झाले. श्री योगेश सोळंकी, उप. व्यवस्थापक (सुरक्षा) यांनी RCF मधील सुरक्षा पद्धतींबद्दल थोडक्यात माहिती दिली. QC सदस्यांनी नृत्य नितीका सादर केली. ट्रॉम्बे गुणवत्ता संकल्पना उपक्रमांचे संक्षिप्त सादरीकरण श्री अमित मानकर, मुख्य व्यवस्थापक (I.E.) यांनी दिले. श्री अनिल कुमार श्रीवास्तव, ई डी (ट्रॉम्बे) यांनी गुणवत्ता संकल्पना आणि कर्मचारी सहभाग योजनांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सहभागावर भर देण्याबद्दल थोडक्यात अहवाल दिला. मान्यवरांच्या हस्ते विविध QC/LQC पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शेवटी मा. सीएमडीने आरसीएफच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आणि मंचाला मुख्य भाषण दिले.

Previous articleलासलगाव सह पंचक्रोशीतील वारक-यांसाठी माऊली चे मंदिर म्हणजे आळंदी ची जणु पर्वणीच —
Next articleपत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांचा सातलवाडा येथे सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here