• Home
  • 🛑 तीन महिन्यांसाठी साडेपाच कोटी खर्च : ऍटो क्‍लस्टरमध्ये देणार रुग्णसेवा 🛑

🛑 तीन महिन्यांसाठी साडेपाच कोटी खर्च : ऍटो क्‍लस्टरमध्ये देणार रुग्णसेवा 🛑

🛑 तीन महिन्यांसाठी साडेपाच कोटी खर्च : ऍटो क्‍लस्टरमध्ये देणार रुग्णसेवा 🛑
✍️ पुणे:( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पिंपरी/चिंचवड:⭕ शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ऍटो क्‍लस्टर येथे रुग्णालय उभारण्यात आले आहे. याठिकाणी 150 ऑक्‍सिजनयुक्त बेड व 50 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शहरातील खासगी रुग्णालयाला कामकाज देण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्याकरिता साडेपाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये आयसीयूची सोय करण्यात आली आहे. तसेच साधे 150 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्टनुसार निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी स्पर्श रुग्णालय व रुबी एलकेअर या दोन रुग्णालयांनी निविदा सादर केल्या. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त दोन निविदा असतानाही त्या उघडण्यास मान्यता देण्यात आली.

स्पर्श रुग्णालयाने 50 आयसीयू बेडकरिता प्रतिबेड प्रतिदिन 6 हजार 450 रुपये, तर 150 ऑक्‍सिजयुक्त बेडकरिता प्रतिबेड प्रतिदिन 1 हजार 950 रुपये दर सादर केला. रूबी एलकेअर यांनी 50 आयसीयू बेडकरिता प्रतिबेड 11 हजार 470 रुपये, तर 150 ऑक्‍सिजनयुक्त बेडसाठी प्रतिबेड प्रतिदिन 1 हजार 259 रुपये दर सादर केला. याची छाननी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. या समितीची 21 ऑगस्ट रोजी बैठक झाली. त्यामध्ये तीन महिन्याच्या मुदतीचा विचार करता स्पर्श रुग्णालयाने सादर केलेल्या दराने 5 कोटी 53 लाख 50 हजार रुपये होतात.

तर रुबी एलकेअरचे 6 कोटी 86 लाख 11 हजार रुपये होतात. स्पर्श रुग्णालयाने दिलेला दर हा लघुत्तम असल्याचा अभिप्राय समितीने दिला. त्यानुसार 5 कोटी 53 लाख 50 हजार रुपये खर्च मध्यवर्ती भांडार विभागाकडील करोनानिधी या लेखाशीर्षामधून भागविण्यात येणार आहे…⭕

anews Banner

Leave A Comment