• Home
  • 🛑 पुणे करांनो मास्क वापराचा….! गेल्या तीन दिवसांपासून तब्बल गोळा केला इतका दंड वसूल 🛑

🛑 पुणे करांनो मास्क वापराचा….! गेल्या तीन दिवसांपासून तब्बल गोळा केला इतका दंड वसूल 🛑

🛑 पुणे करांनो मास्क वापराचा….! गेल्या तीन दिवसांपासून तब्बल गोळा केला इतका दंड वसूल 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ गेले ५ महिने राज्यासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यात सुरुवातीपासुन मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर, मुंबईमध्ये काही प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती भयंकर होत असून रुग्णालयात बेड्स देखील उपलब्ध होत नसल्याचे समोर आले होते. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासून रोगाला प्रतिबंध करण्यासाठी मास्क आवश्यक करण्यात आला होता. यानंतर देखील नागरिक सामूहिक ठिकाणी मास्क न घालता वावरताना आढळल्याने ५०० रुपयांचा दंड लावण्यास सुरुवात करण्यात आली होती.

दरम्यान, पुण्यातील परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी हा दंड वाढवून १००० रुपये इतका केला होता.

अजित पवारांच्या कडक इशाऱ्यानंतर पुण्यात मास्क न घालणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.

पोलिसांसह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत तपासणी सुरु केली. गेल्या तीन दिवसात 5200 जणांना यासाठी दंड ठोठावला आहे. त्यामुळे, तीन दिवसात पोलिसांनी सुमारे 25 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे.

नागरिकांना वारंवार आवाहन करून देखील मास्कचा वापर न करणाऱ्यांमुळे कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत.

दरम्यान, पुणे शहरात काल नव्याने २,०५३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या १ लाख ०७ हजार ९५८ झाली आहे. तर १,६३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १६ हजार ८३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काल ३७ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली….⭕

anews Banner

Leave A Comment