Home राजकीय माझी कैफियत जनतेच्या दारात निवडणूकीच्या रणधुमाळीत कुणाला चढवणार कुणाला आपटवणार….!!

माझी कैफियत जनतेच्या दारात निवडणूकीच्या रणधुमाळीत कुणाला चढवणार कुणाला आपटवणार….!!

244

राजेंद्र पाटील राऊत

माझी कैफियत जनतेच्या दारात
निवडणूकीच्या रणधुमाळीत कुणाला चढवणार कुणाला आपटवणार….!!
वाचक,
मित्रांनो,मी गेल्या सहा महिन्यापासून कौळाणे (निं.) आणि व-हाणे गावी पत्रकार भवन व निवासस्थानाला जागा मिळावी म्हणून शासनाच्याच परिपत्रकानुसार संघर्षात्मक लढाई शांततेच्या व सबुरीच्या मार्गाने लढत आहे,व-हाणे गावी पत्रकार भवन व निवासस्थानासाठी जागा मागणीबाबतचे पत्राला अनुसरुन मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी तेथील ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांना याप्रकरणी तातडीने कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याबाबत लेखी आदेश पत्र दिल्यावर सुध्दा ग्रामसेवक मँडम यांनी त्या पत्राला केराची टोपली दाखविली.व मुद्दामहून टाळाटाळ करुन अडवणुक केली.वास्तविक व-हाणे गावी संपूर्ण गावाला अतिक्रमणाचा विळखा पडलेला आहे,त्यावेळी तेथे विरोध करण्याचे सत्कार्य कुणी केले नाही.आणि आता पत्रकार भवन निवासस्थानाच्या जागेसाठी मुठभर विरोधकांच्या समाधानासाठी ग्रामसेविका मँडम यांनी शासन निर्णयाला व गटविकास अधिकाऱ्यांच्या पत्रालाही कवडीचीही किंमत दिली नाही,आणि आता तेच गाव विकासाच्या गप्पा मारणारे पुन्हा ग्रामपंचायत निवडणूकीत लोकांसमोर मोठया नाकाने गावाचे भले करायला निघालेत..आम्हीच खरे गावाचे समाजसेवक असा बुरखा पांघरुन काही लबाड व भामटी हडवाळही आता या निवडणूकीत गुडघ्यालाच बाशिंग बांधून उतरलेली आहेत.मात्र याची ओळख खर तर सुजान मतदारांनी करायला हवी.वास्तविक ज्या पत्रकार भवनच्या लोकपयोगी कामाला ग्रामसेविका मँडम यांनी मुठभर विरोधकांना खुश करण्यासाठी अडचणी वाढवल्यात…त्याच मँडमानी गावात वाचनालयाला जागा देताना कुणाच्या आशिर्वादाने ना ठराव,ना मासिक मिटींग ,ना ग्रामसभा किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही जागा देऊन टाकली.म्हणजे हे नेमके राजकारण काय आहे?,यामागील गौडबंगाल काय?झारीतले नेमके शुक्राचार्य कोण?आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय अशी अवस्था करणाऱ्याचे नेमके पत्रकार भवन प्रश्नी पोट का दुखतेय…याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही.त्यापेक्षा कौळाणे गावात भयानक प्रकार घडला आहे अगोदर पत्रकार भवनला दिलेली जागा ग्रामसेवक संजय घोंगडे यांनी तत्कालीन सरपंचाच्या दबावाला बळी पडून नामंजूर करीत असल्याचे परस्पर लिहून ठेवले,वास्तविक कुठलीही जागा नामंजूर करताना विभागीय महासूल आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते याचे पुरेसे ज्ञान ग्रामसेवकांना असू नये म्हणजे त्यांच्या बुध्दीची किव येते,
म्हणजे या प्रकरणावरुन एक सिध्द होते की,गावकीच्या राजकारणात मुठभर पुढाऱ्यांच्या दबाव,दडपणात ग्रामसेवक भरडले जातात.मात्र गाव विकासाच्या गप्पा मारणा-या अशा लोकप्रतिनिधीच्या कर्तृत्वामुळे गावागावाचे पुरते वाटोळे होण्याची वेळ आलेली आहे,तरी सुजान मतदार कधी जागा होणार?हाच महत्त्वाचा प्रश्न यानिमिताने येथे उपस्थित करावासा वाटला!
हरलो नाही अजून,जिंकायची मोठीच लढाई बाकी आहे.येणारा काळच सांगेल,माझे लेखनीयुध्द न्यायासाठी अखेरपर्यत झटतच राहणार    राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक युवा मराठा न्युज महाराष्ट्र*महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष -एडिटर्स अँन्ड जर्नालिस्ट वेल्फेयर असोशियन मुंबई

Previous articleहातकणंगले तालुक्यातील एकमेव ग्रामंपचायत मौजे.तासगाव बिनविरोध
Next articleसलमान खानचे दोन भाऊ , पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.