• Home
  • सलमान खानचे दोन भाऊ , पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल

सलमान खानचे दोन भाऊ , पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210105-WA0008.jpg

सलमान खानचे दोन भाऊ , पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल

बाँलीवुड चा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचे बंधू अरबाज खान, सोहेल खान व सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान यांच्या विरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे.
२५ डिसेंबर रोजी हे तिघेही यूएईवरून मुंबईत परतले होते. मात्र मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बुकींग असल्याचं सांगून ते परस्पर घरी निघून गेले होते. एकीकडे करोनाचं नवं संकट येत असताना, बॉलिवूडमधील बड्या कलाकारांकडून अशा प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आल्याचं समोर येत आहे. एबीपी माझाने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
नव्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवासाता सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहावं लागतं.
त्यानुसार त्यांचं बुकींग हे ताज लॅण्डमध्ये करण्यात आलं होतं. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी महापालिकेने जेव्हा आढावा घेतला, तेव्हा ते तिघे तिथं गेलेच नसल्याचं समोर आलं. हे तिघे परस्पर घरी गेल्याचं उघडकीस आलं होतं. त्यामुळे आता मुंबई महापालिकेकडून त्यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment