• Home
  • 🛑 अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कधी होणार परीक्षा? असं असू शकतं वेळापत्रक 🛑

🛑 अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कधी होणार परीक्षा? असं असू शकतं वेळापत्रक 🛑

🛑 अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची कधी होणार परीक्षा? असं असू शकतं वेळापत्रक 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 4 सप्टेंबर : ⭕ यूजीसीच्या सूचनेनंतर सुप्रीम कोर्टानेही अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर राज्य सरकारला या परीक्षा घ्याव्या लागणार हे निश्चित झालं. त्यामुळे परीक्षा कशी आणि कधी घ्यावी याबाबत निर्णय घेण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आणि निकालाबाबत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

‘आजच्या बैठकीत निर्णय झाला की आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत सोमवार किंवा मंगळवारी बैठक घेऊ. उद्या आणि परवा प्रत्येक कुलगुरू यांनी त्यांच्या परीक्षा बोर्ड आणि कौन्सिलकडे अहवालाच्या सूचना कळवाव्यात. आजच्या बैठकीत अहवालातील काही त्रुटींवर चर्चा केली जाईल. 31 अक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

➡️ कधी होणार परीक्षा?

‘ऑक्टोबरमध्ये महिन्याभरात परीक्षा घेऊ. प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा फिजिकली करण्यास लागू नये अशी पद्धत अवलंबणार आहोत. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आहेत. त्यावर चर्चा सुरू आहेत. परीक्षा मात्र सोप्या पद्धतीने होतील यावर एकमत झालं आहे,’ असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रॅक्टिकल्स होतील. याचाच अर्थ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील आणि 31 ऑक्टोबरच्या आधी निकाल जाहीर होतील. विध्यार्थ्यांना मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला करावा लागणार आहे.

➡️ ‘राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही’

‘परीक्षेबाबतच्या उर्वरित बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ. आज अहवाल फायनल करून उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आहोत. राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाली,’ असंही सामंत यांनी म्हटलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment