Home नांदेड माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे दुखःद निधन – कोकलेगाव परिसरात...

माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे दुखःद निधन – कोकलेगाव परिसरात शोकाकळा

102
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे दुखःद निधन – कोकलेगाव परिसरात शोकाकळा

राजेश एन भांगे/ ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

नांदेड – नायागांव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील रहिवासी असलेले तथा जिल्हा परिषद सदस्य दिवंगत पांडुरंग घनश्याम गायकवाड यांचे हैद्राबाद येथे दवाखान्यात उपचार चालू असताना दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास दुखः द निधन झाले.
ते ६० वर्षाचे होते त्यांच्या निधनाने कोकलेगावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील कोकलेगाव नगरीचे सरपंच पदाचे कुशल नेतृत्व सांभाळून गावकर्‍याच मन त्यांनी जिंकले होते कोकलेगावची ग्रामपंचायत तोडून घेऊन स्वातंत्र्य करून घेऊन राजगडनगर ग्रामपंचायतची स्थापना केली असल्यामुळे मागासवर्गीय समाजाच व्यक्तिमत्व असलेला सक्रीय कार्यकर्ता म्हणून सर्वांच्या परिचयत होते.

कुंटूर जिल्हा परिषद गटातुन माजी राज्यमंत्री तथा मा. खासदार दिवंगत गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सन २०१२ मध्ये निवडणूक लढवून जिल्हा परिषदचे सदस्य झाले होते. आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक जास्त मते मिळवून त्यांनी विजय प्राप्त करून मान मिळविला होता.

माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांनी कुंटूरकर यांच्या माध्यमातून कुंटूर जि प सर्कलचा दर्जेदार विकासासाठी वरच्या पातळीतुन निधी खेचून आणून विकासाचे कामे जोरदार केले त्यांच्या निधनामुळे राजकारणातील राजकारणी काळाच्या पडद्याआड गेल्याने विविध संघटने कडून भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून त्यांच्या पश्चात दोन पत्नी, पाच मुली, तीन मुले असा मोठा परिवार आहे.

भावपूर्ण आदरांजली.

Previous articleमुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)   (युवा मराठा न्युज नेटवर्क) दि. १३ एप्रिल २०२१
Next articleडाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here