Home सामाजिक डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत

डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत

217
0

राजेंद्र पाटील राऊत

डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आधुनिक भारत

डाँ भिमराव आंबेडकर म्हणजेच बहुजनांचे बाबासाहेब. बहुजनांच्या न्यायहक्कासाठी झटणारे व स्वातंत्र्य लढ्यातील जेष्ठ नेते होते . थोर कायदेपंडीत , शिक्षण तज्ञ , गाठे विद्वान आणि जेष्ठ समाज सेवक असे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर 
           अपरिमित धाडस , जिज्ञासा व ज्ञानाचा त्रिवेणी संगम म्हणजेच आंबेडकर आणि त्यांची यशोगाथा बघतांना भारताच्या भविष्यकर्त्याच्या वाटेला जातियतेची दाहक ज्वालामुखी यावी ही मोठी शोकांतीका आहे . भारतीय वर्णव्यवस्थेमुळे बाबासाहेबांनी शाळेच्या बाहेर बसून शिकावे लागेल व त्यानंतर त्यांनी मुंबईच्या एलीफिस्टन महाविद्यालयातून पदवी संपादन करुन न्युयार्कच्या कोलंबिया युनिर्व्हसिटीच्या कॉलरशिपवर डॉक्टरेटची पदवी मिळवून सन १ ९१६ मध्ये युनायटेड किंगडम येथील लंडन स्कुल ऑफ इकॉलॉमिक्स येथे शिक्षण घेतले अणि ग्रेज इन मधून बार अँट लॉ ची पदवी संपादन केली . उपेक्षित समाजातील आंबेकरांनी एम.ए. , पी.एच.डी. , डि.एस.सी. , एल.एल.डी., डि.लिड . , बार अँट लाँ अशा पदव्या संपादन करुन भारतात परतले . तेव्हा इंग्रजांनी त्यांना न्यायाधिशाची नोकरी देवू केली . तेव्हा त्यांनी बहुजन समाज व भारताच्या उध्दारासाठी स्वतःला वाहून घेतले आणि बहुजन समाजाचे ते प्रेरणास्थान बनले . शुद्र बहुजनांच्या कल्याणासाठी अनेक संस्था संघटना उभ्या केल्या. व मनुस्मृतीचा आगडोंब उठविणारे राखरांगोळी करणारे आंबेडकर हे प्रथमच होते आणि त्यातच आंबेडकरांना राज्यघटना समितीचे अध्यक्ष बनले व घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी घेवून मसुदा समितीच्या रुपाने बहुजनांच्या कल्याणाची चावीच त्यांच्या हाती लागली आणि भारतात लोकशाहिचं रोपटं बाबासाहेबांनी लावलं आणि घटनेच्या दुसऱ्या भागातच कलम ५ मध्ये सर्वांना समान नागरिकत्वाचा अधिकार दिला सर्वांना ही तेच नागरिकत्व तर बहुजन शुद्रांनाही तेच नागरिकत्व देऊ केले व घटनेच्या तिसऱ्या भागात मुलभूत अधिकारांचा समावेश करुन सर्वांगिण समनता स्वातंत्र्य प्रस्थापित केले व घटनेच्या कलम १४ मध्ये समतेचा अधिकार देवून कलम १५ नुसार जात , धर्म , वंश , लिंगभेद मानण्यास मज्जाव केला आणि घटनेच्या या दोन कलमातच पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या जातीयत: अस्पृश्यत: संपुष्टात आणून मनुवाद्याच्या अस्तीत्वाला सुरुंग लावला आणि तेवढ्यावरच आंबेडकर थांबले नाहीत तर गुलामगिरी व वेठबिगारी स्वातंत्र्याचा अधिकार देवून संपवली तर घटनेच्या १९ ते २२ या कलमांमध्ये स्वातंत्र्य देवून सर्वांना स्वत: च्या इच्छेनुसार जगण्याचा , काम करण्याचा अधिकार दिला मनुस्मृतीने देवू केलेल्या कामांवरची मक्तेदारी संपवली आणि तरीही कोणी ही कुणाला दास किंवा गुलाम बनवू पाहत असेल तर किंवा कोणत्याही प्रकारचे शोषण करत असेल तर आंबेडकरांनी ते वेळीच ओळखून कलम २३ व २८ मध्ये शोषणाविरुद्धाचा अधिकार देण्यात आला व बहुजन व शुद्रांना सेवाभावापासून मुक्त करुन संरक्षणही प्राप्त करून दिले व २५ ते २८ कलमांमध्ये धर्म स्वातंत्र्यही प्रदान करण्यात आले , तर कलम २९ व ३० नुसार शिक्षणाचा अधिकार बाबासाहेबांनी जनतेला दिला व शिक्षित व ज्ञानी समाजाचे स्वन पाहिले होते , तर समाजातील प्रत्येक घटकाला संपत्तीचा अधिकारही आंबेडकरांनी मिळवून दिला . या मुलभूत अधिकारांमुळे भारतातील समाजरचनेत फार मोठा अमुलाग्र बदल घडणार होता यात शंका नव्हती . मात्र मनुस्मृतीच्या साखळदंडात जोखडलेल्या स्त्रियांनाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हवे त्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली . स्त्रियांना समान आरक्षण देवून मुख्य प्रवाहात आणले आणि अगदी ग्रामपंतायच सदस्य , सरपंच , ग्रामसेवकांपासून ते आमदार , खासदार , मंत्री , राष्ट्रपती , कलेक्टर , आय.ए.एस. अशा अनेक खुर्च्या महिलांसाठी आंबेडकरांनी मिळवून दिल्या . आज मोबाईल , लॅपटॉप अशी अनेकविध संसाधने महिलांच्या हातात देणारे आंबेडकरच , या सगळ्या वस्तू जरी टेक्नोलॉजीने आणल्या मात्र त्या तुमच्यापर्यंत पोहचवण्याचे योगदान आंबेडकरांचेच नाहीतर मनुस्मृतीने महिलांना चुल आणि मुलं एवढ्यापर्यंत सिमीत ठेवनू व्यक्तिगत संपत्ती व अन्याय अत्याचार व प्रजननाचा कारखानाच बनून राहिल्या असत्या . त्यातून महिलांना अस्पृश्यांना व बहुजनांना मनुस्मृतीतून मुक्त करून भारतीय लोकशाहीचा मतदार राजा बनवले आणि भविष्यातही लोकशाहीच असावी व मतदार राजा हा राजाच राहवा म्हणून संविधानात चेक्स अँण्ड बॅलन्सची तरतूद करुन लोकशाही बळकट करण्याची दुरदृष्टी आंबेडकरांची होती . पण म्हणतात ना मोफत मिळे त्याची किंमत काय कळे तशी आपली अवस्था झाली आहे . अमेरिकेसारख्या प्रगत देशात गुलामगिरी व बेठबिगारी नष्ट करण्यासाठी मार्टिन ल्युथर किंगला केवढा लढा द्यावा लागला , तर दक्षिण अफ्रिकेत लोकशाहीसाठी नेल्सन मंडेलांना २७ वर्ष तुरुंगात काढावी लागली . पाकिस्तानात बेनझीर भुट्टोंना पाण गमवावे लागेल , तर अलिकडेचीच गोष्ट घ्या म्यानमानमध्ये नॅशनल लिग फॉर डेमोक्रेसी या पक्षाला प्रदिर्घ लढा द्यावा लागला . पण भारतात आंबेडकरांनी या साऱ्या गोष्टी आम्हाला एकाच क्षणात देवनू टाकल्या त्यामुळे त्यांची किंमत कळालीच नाही . आपली मनोवृत्ती आणि काही अहं यास आडवा येतो तेच खरे मग फक्त एकदिवस मनुस्मृतीनुसार जगा तेव्हा बहुजनांना आंबेडकर कळतील आणि तेव्हाच साराभारत त्यांचा आजन्म ऋणी राहिल . लोकशाही दिली , मतदार बनवलं , – अधिकार मिळवून दिले तरीही आंबेडकरांचे कार्य थांबले नाही . अनेकाविध क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला ठसा उमटवला व आधुनिक भारत उभा केला . आंबेडकरांनी सन १९२३ मध्ये the evolution of provincial fincance in british india या विषयावर शोधनिबंध लिहिला व त्यातूनच भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली व त्याचाच आधारे घटनेत २८० वे कलम तयार करण्यात आले व वित्तआयोगाची स्थापना करण्यात आली व देशाची आर्थिक स्थिती मजबूत झाली व रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी यांनी आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिझर्व बैंक ऑफ इंडियाची स्थापन केली व या कमिशनने पुढे आंबेडकरांचा ग्रंथ the problem of the Rupee it’s Problem’s it’s Solution’s या ग्रंथाच्या आधारे रिझर्व बैंक ऑफ इंडिया अँक्ट १९३४ हा कायदा संमत करण्यात आला हे आंबेडकरांचे अर्थव्यवस्थेतील योगदान भारताला सक्षम व विकसित राष्ट्र बनविण्यास महत्वपूर्ण कार्य केले . त्यानंतर कामगारांचाही विचार व त्याचे जीवनमान उंचविण्यासाठी सन १९४२ च्या व्हाईस रायच्या काऊंसिल मधले श्रममंत्री असतांना आंबेडकरांचे योगदान बघता येईल व कामगारांच्या कामातील १२ तासांच्या कामातील ४ तास कमी करत ८ तास केले देशामध्ये नोकऱ्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची सुरुवातही आंबेडकरांनी केली व कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळावा व कामगारांच्या आरोग्याचे भान ठेवून त्यांना ESIC ची संकल्पना आंबेडकरांनी मांडली तसेच निवृत्तीवेतन बाबतची संकल्पनाही डाँ आंबेडकर यांनी मांडली होती व तेवढेच नाहीतर महिलांना प्रसुतीकाळात सहा महिने पगारी सुट्टीही आंबेडकरांचीच देणं आहे तसेच पाणीपुरवठा व विद्युत पुरवठाचा या क्षेत्रातही आंबेडकरांचे अभुतपूर्व योगदान आहे . म्हणून सेंट्रल टेक्नीकल पॉवर बोर्ड , नैशनल पॉवर ग्रीड सिस्टम , सेट्रल वॉटर , इरिगेशन आणि नोरिगेशन अशा मंडळाची स्थापना त्यांनी केल्या तर दामोदर हॅली प्रकल्प , हिराकुंड प्रकल्प अणि सोननदी प्रकल्प बाबासाहेबांच्या प्रयत्नातूनच साकार आंबेडकरांच्या समतावादी विचारसरणीतून त्यांनी महिलांना समान वारसाहक हा हिंदु सेक्सशन अँक्ट १९५६ यामध्ये बदल करुन महिलाही वडिलांच्या संपत्तीत समान वारसदार असण्याची तरतूद सुचवली होती . ती हिंदु कोड बिलामुळे रखडली गेली व १९५१ मध्ये ओबीसीं च्या न्यायहक्कासाठी व आरक्षणासाठी केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळी ओबीसींच्या न्यायहक्कासाठी व आसक्षणासाठी केंद्रीयमंत्रीपदाचा त्याग करणारे आंबेडकरांनी ओबीसींची तरतूद संविधान करण्यता आली होती . मात्र ओबीसीची निश्चित करुन आरक्षण देण्यात येण्याची तरतूद घटनेच्या कलम ३४० नुसार करण्यात आली , तर ३४१ नुसार एसटी , अनुसूचित जमाती तर ३४२व्या कलमात अनुसूचित जातीसाठी आरक्षण देवून मागासवर्गांना सामाजिक प्रवाहात आणले व सर्वांगिण विकास घडवून आणला . त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची शान उंचविण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे व आज सारेच देश भारतीय संविधानाचा हेवा करताहेत , तर घटनेच्या ३१४ कलमानुसार स्थापन झालेल्या निवडणुक आयोगाचे प्रथम आयुक्त यांना सुदानमध्ये आमंत्रित करण्यात येते , तर अनेकदेशात आजही भारतीय निवडणूक आयुक्तांना निमंत्रित करण्यात येते ही एक गर्वाची बाब आहे . भारतीय संविधान हे नाविन्यपूर्ण आहे . ते तितकेच ताठर तर तितकेच लवचिकही आहे आणि भारतासारखा विशाल लोकसंस्थेचा देश भक्कमपणे उभा आहे . ते आंबेडकरांच्या दुरदृष्टीमुळेच शक्य झाले . स्वातंत्र्यानंतरच्या प्रवासामध्ये भारताने बरीच यशाची शिखरे सर केले . प्रत्यक्ष जनतेने देशाचे भवितव्य ठरवले . स्वतंत्र न्याय प्रणाली आणि सशक्त निवडणूक आयोग यांनीही आपापली कामगिरी चोख पार पाडली आहे व समाजातील काही वर्गाला सामाजिक आर्थिक ‘ आणि राजकीय प्रवाहापासून अलीप्त ठेवण्यात आले होते . त्याच्यासाठी आरक्षणाचा अवलंब करुन मुख्य प्रवाहात घेवून येण्याचे काम डॉ . आंबेडकरांनी केले . आज आर्थिक आघाडीवर महत्वपूर्ण भूमिका बजावून गेल्या ६० वर्षामध्ये दारिद्र्यरेषेचे प्रमाण ६० टक्क्यावरुन ३० टक्क्यावर आले . ही भारतीय अर्थव्यवस्थेचीसु धारणा आंबेडकरांच्या रिझर्व बैंक ऑफ इंडिया संकल्पनेमुळेच भारत दारिद्रयमुक्त होऊ पाहत आहे . त्यामुळे अज्ञान दारिद्रय  बेकारी यांचा समुळ नायनाट होऊन भारत महासत्तेच्या दिशेने वेगाने धावत आहे . मात्र यामध्ये अस्पृश्यता मानद अडथळा होऊ पाहत असून काही लोक आंबेडकरांच्या स्वप्नातील भारताला अडथळा निर्माण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत. त्यामुळेच सर्वांना एकत्र येवून आंबेडकरांच्या स्वप्नातील आधुनिक भारत , मुर्तस्वरुपात आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे . असो बाबासाहेबांचा संदेश आणि जिवनशैली आपण कधिही विसरू शकणार नाहीत . भारतीय संविधान , सुदृढ लोकशाही , आधुनिकतेतघडणारा भारत व प्रत्येक मनातून आपल्याला डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होत राहिल अणि खऱ्या अर्थाने हाच आपला वसां आहे. मात्र बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवत असतांना मानसामानसामध्ये कसलाही फरक करता कामा नये जाती धर्माची थोथांड सोडावीत आणि आंबेडकरांनाच नाही तर कोणत्याही महापुरुषास जातिधर्माच्या बंधनात साखळदंडात जोखड नका . त्याच्या विचारांच्या व्यासपिठ मुक्त कराआणि समाजाचा उध्दार करून घ्या कोणत्याही महापुरुषाने जाती धर्मापेक्षा राष्ट्राला व समाजसुधारण्याला प्रथम स्थान दिले मात्र आपणच आपल्या संकुचित विचारांनी महापुरुषांना त्यांना आपल्या पुरत सिमीत केलं आणि राष्ट्राच्या उध्दारात बाधा निर्माण करत राहिले. संविधात लागू होऊन ६० वर्ष उलटली मात्र अजुनही आम्ही मनुस्मृतीला विसरत नाही. तेही या महापुरुषांच्या कर्तृत्वानंतर त्यांनी केलेल्या समाजप्रबोधनाला विसरुण आम्ही मनुस्मृतीला मानतो ही फार मोठी शोकांतिका आहे. कोण भारत माता म्हणणार आणि कोणकोणाला शिकवणार यापेक्षा आपण भारत देशाचं किती देणे लागतो याचा विचार केला तर ति बाबासाहेबांनाच नाही तर समस्त महापुरुषांना खरी आदरांजली ठरेल असो शेवटी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान समितीच्या समोर केलेल्या भाषणाचा संदर्भ देऊन मी आपली तुर्तातुर्त रजा घेत आहे . जात आणि वंश हे आपले जुने शञु आहेत . जातिवादी तत्वप्रणालीवर आधास्ति बरेच पक्ष उद्यास आलेले आहेत . संचुलित अशा जातीय वादाला देशापेक्षा अधिक महत्व देणार काय ?  मला सांगता येणार नाही , पण हे असे झाले तर आपले स्वातंत्र्य धोक्यात आणि एकदा जर ते आपल्या हातून गेले तर ते आपल्याला मिळणार नाही . यासाठी आपण खंबिरपणे जातीयवादाच्या वर उठणे आवश्यक आहे . रक्ताचा शेवट्या थेंब सांडेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपण लढत राहिले पाहिजे.

                                      – पंकज गायकवाड /सहसंपादक युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र 

Previous articleमाजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग गायकवाड यांचे दुखःद निधन – कोकलेगाव परिसरात शोकाकळा
Next articleमहावितरणची डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नवी योजना! ऊर्जामंत्र्यांचा पुढाकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here