आमदार राजूबाबा आवळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद हातकणंगले तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत मौजे.तासगांव बिनविरोध झाली आहे.
हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे मा. आमदार राजूबाबा आवळे यांनी ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करणाऱ्या गावांना शासनाच्या फंडातून विशेष बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार हातकणंगले तालुक्यातील मौजे. तासगाव ग्रामपंचायतीने पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली. तासगावचे नेते माजी.सरपंच मा. शिवाजीराव पाटील( काका) यांनी आमदार राजूबाबा यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कपिल पाटील , वडगांव शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण भैया , माजी. अर्जून कोकाटे , चंद्रकांत गुरव , अनिल गाडवे , तासगांवचे नेते माजी.सरपंच मा.शिवाजीराव पाटील (काका) ,तानाजी पाटील , कृष्णात पाटील( सर)
इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .
ग्रामपंचायत तासगांव बिनविरोध झाल्याने गुलालाची उधळन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला व संपूर्ण गावात आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .




