• Home
  • अंबपवाडी,मनपाडळे गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, मा.आमदार राजू बाबा आवळे

अंबपवाडी,मनपाडळे गावातील विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, मा.आमदार राजू बाबा आवळे

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (कोल्हापूर विभागातील ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भागातील सर्व मुक्कामी एसटी बसेस बंद केल्या होत्या.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून इचलकरंजी आगारातील व कोल्हापूर विभागाने हातकणंगले तालुक्यातील काही गावांमधील मुक्कामी एसटी बसेस पुन्हा चालू केल्या आहेत .
परंतु मनपाडळे गावातील मुक्कामी एसटी बस अद्यापही चालू केली नसून ती लवकरात लवकर चालू करावी अशी मनपाडळे गावातील विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी ,व गावातील नागरिकांनी मनपाडळे, अंबपवाडी , अंबप या गावातील एसटी.बस चालू नसल्याने शाळा काँलेजला जाणेकरीता गैरसोय होत असुन
लवकरात लवकर मनपाडळे मुक्कामी एसटी बस चालू करून विद्यार्थ्यांची शाळा, काँलेजला येण्यासाठी होणारी गैरसोय त्वरीत थांबवून एसटी बस चालू करण्यासाठी मनपाडळे गावातील विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी ,व गावातील नागरिकांनी हातकणंगले तालुक्याचे आमदार राजुबाबा आवळे भेट देऊन विणंती केली.
यावेळी अंबपवाडी ग्रामस्त , व मनपाडळे गावचे ग्रामस्त , विद्यार्थी मोठ्या संख्येने आले असता त्यावेळी त्वरीत हातकणंगले तालुक्याचे मा.आमदार श्री राजू बाबा आवळे यांनी इचलकरंजी आगार व्यवस्थापक श्री. बोगरे यांना संपर्कसाधून तातडीने मनपाडळे मुक्कामी एसटी चालू करणेस सांगितले .
तसेच मनपाडळे गावामध्ये
श्री. रामदास स्वामी समर्थ स्थापित अकरा मारुती पैकी एक मारुतीचे मंदिर असुन,
इतर परिसरातील भाविकांना एसटी.बस चालु नसल्याने दर्शनासाठी देखील
गैरसोय होत असुन
प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सेवेकरीता एसटी. बस इचलकंजी आगाराने मनपाडळे गावातील मुक्कामी एसटी बस पुर्वरत चालू करावी.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment