• Home
  • 🛑 धैर्य सामाजिक संस्थेमार्फ़त शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर सुरू 🛑

🛑 धैर्य सामाजिक संस्थेमार्फ़त शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर सुरू 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210309-WA0080.jpg

🛑 धैर्य सामाजिक संस्थेमार्फ़त शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर सुरू 🛑
✍️ रायगड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

पोलादपूर:-⭕रायगड जिल्हा परिषद शाळा चांभारगणी बु. येथील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या धैर्य सामाजिक संस्थेमार्फत आज दिनांक ०४/०३/२१ पासून शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर सुरू करण्यात आले असून हे शिबीर मे महिन्यापर्यत चालू असणार आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, आणि सर्व विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, मदतनीस सुजल चव्हाण, शाळेचे शिक्षक वृंद, ज्ञानेश्वर उतेकर सर, रवींद्र वाईकर सर, सोडणवार सर आणि व्यवस्थापन समिती सदस्य रमेश शेलार ‘ ग्रा.पं. सदस्य सतिश गोळे उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर यांनी लोप पावत चाललेली प्राचीन युद्धकला स्वतः आत्मसाद केली असून या युद्ध कलेचा प्रसार होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य आणि शस्त्रांची माहिती देण्याचे कार्य धैर्य समाजिक संस्थेच्या माध्यमातून करत आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment