• Home
  • आठवड्यातून दोनदा बाजार भारविण्याची वडगांव व्यापारी असोसिएशन ची मागणी

आठवड्यातून दोनदा बाजार भारविण्याची वडगांव व्यापारी असोसिएशन ची मागणी

 

 

वडगांव : (प्रतिनीधी) हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात पुर्वी पासुन मोठ्या प्रमाणात सोमवारचा आठवडी बाजार भरतो आहे .
तसेच जनावरांचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरत असतो, वडगांवच्या बाजारला हातकणंगले तालुक्यातील जवळपास छत्तीस खेड्यातुन व कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील व कर्नाटकातुन देखील लोक खरेदी विक्रीसाठी येत असतात. तालुक्यातील कुंभोज सारख्या खेडेगावात आठवड्यातून दोन दिवस बाजार भरतो , त्याचप्रमाणे वडगांव शहरात सोमवारच्या बाजारप्रमाणेच गुरुवार किंवा शुक्रवारी आणखी एक आठवडी बाजार नविन वर्षापासुन भरवण्यास प्रारंभ करावा यासाठी वडगांव व्यापारी असोसिएशन च्या वतीने वडगांव पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री .मोहनलाल माळी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. २०२१ या नविन वर्षापासुन आठवड्यातून दोन दिवस बाजार भरविण्याचे नियोजन वडगांव नगरपालिकेने करावे . आठवडयातुन दोन दिवस बाजार भरविल्यामुळे तरूणांना रोजगार उपलब्ध होईल , शहराची आर्थिक व्यापाराची उलाढाल त्याच बरोबर आवक जावक वाढेल, तसेच शहराची प्रगती मोठ्या प्रमाणात होईल , आसपासच्या सर्व शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री वाढेल त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल वाढेल व यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल , शहरातील व्यापार देखील वाढेल , तसेच स्थानिक व आजुबाजुच्या सर्व खेडयांतील व परिसरातील व्यापाऱ्यांची आर्थिक सुबत्ता वाढेल . या दृष्टीने सर्वाच्या हितासाठी निवेदन देऊन
लवकरात लवकर आठवड्यातून दोन दिवस बाजार भरविण्याचा निर्णय घ्यावा अशी विणंती व्यापारी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी केली.
वडगांव व्यापाऱ्यांनी सर्वांच्या फायद्यासाठी अतिशय चांगली कल्पना केली आहे , यामुळे तरूणांना रोजगारापासुन व्यापार उद्योग वाढीसाठी , शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल वाढीसाठी जो महत्वाचा निर्णय घेतला आहे त्याचे नियोजन लवकरात लवकर करण्याचे आश्वासन लोकनियुक नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष यांनी व्यापारी असोसिएशन च्या कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी उपस्थित पालिकेचे उपनगराध्यक्ष श्री.संतोष उर्फ बंडा चव्हाण , नगरसेवक श्री.संतोष गाताडे ,
इत्यादी मान्यवर व असोसिएशन पदाधिकारी सर्व व्यापारी बंधू ,व फिरते लहान, मोठे बाजारकरी व्यापारी वर्ग उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment