Home जालना ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती सतीश घाटगे यांची कृतज्ञता :  शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी घरपोच...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती सतीश घाटगे यांची कृतज्ञता :  शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी घरपोच आली ‘समृद्धी’ची साखर

15
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_073230.jpg

ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती सतीश घाटगे यांची कृतज्ञता :  शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी घरपोच आली ‘समृद्धी’ची साखर

घनसावंगी / अंबड जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):   समृध्दी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी कन्यादान योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत अंबड- घनसावंगी तालुक्यातील  देवी दहेगाव,   वडीकाळ्या व तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांना सतीश घाटगे यांच्या माध्यमातून घरपोच एक क्विंटल साखर देण्यात आली.

उस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी भाव देण्याबरोबरच त्यांच्यासाठी हिताचे ठरणारे  सामाजिक उपक्रम  समृध्दी साखर कारखाना राबवतो. कारखान्याच्या  सामाजिक उपक्रमाचा एक भाग असलेली  कन्यादान योजना आहे. या योजनेअंतर्गत कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी
एक क्विंटल साखर मोफत घरपोच  देण्यात आली. सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत.  देवी दहेगाव येथील समृध्दी साखर कारखान्याचे दिवंगत सभासद  कै.गंगाधरराव रामप्रसाद शिंदे, तिर्थपुरी येथील सभासद विनायक माणिकराव चिमणे व अंबड तालुक्यातील वडीकाळ्या येथील सभासद शेतकरी कचरू आसाराम शहाणे यांना मुलीच्या लग्नासाठी कारखाना प्रशासनाने घरपोच साखर नेऊन दिली. यावेळी सभासद शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत सतीश घाटगे व  महेंद्र मेठी यांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे संचलक विकास शिंदे, कर्मचारी जावेद शेख व गावकरी उपस्थित होते.
—————–

Previous articleअजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
Next articleजालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण केली!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here