आशाताई बच्छाव
अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील पढेगांव येथील अजिंक्य इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. नवनाथजी कुंंताळ सर ( प्राध्यापक जी टी एस हायस्कूल बेलापूर) , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय श्री बाळासाहेब, स्कूलचे प्राचार्य श्री अभिजीत खरात सर यांच्यासह सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते .
मराठी भाषा सकल्प बहुजन वर्गाची भाषा असून तिचा महिमा आणि गोडी अविट आहे. असे मत प्रास्ताविकेतून सौ. नूतन पाटोळे मॅडम यांनी व्यक्त केले.
यावेळी इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
मराठी भाषा ही संतांच्या अभंगवाणीतून रुजली असून अनेक संत ,साहित्यिक ,विचारवंत यांच्या लेखणीतून ती साकारली गेली आहे. असे मत मराठी विषय शिक्षक श्री राहुल निकम सर यांनी यावेळी मांडले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि मराठी भाषेचे महत्व प्राचार्य श्री अभिजीत घरात सर यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेमध्ये अनेक जुनी नवीन शब्द यांची सांगड घालणे आधुनिक पिढीसाठी आव्हान आहे असे विचार संस्थेची संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
मराठी भाषेचा गौरव आणि भाषेची गोडी विद्यार्थ्यांना वाढावी इंग्रजी बरोबरच मातृभाषा विद्यार्थ्यांना अवगत व्हावी आणि त्यातूनच समृद्ध पिढी आणि विकसित समाज व्यवस्था निर्माण होईल असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक श्री नवनाथ कु़ंताळ सर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांची मनीची स्पर्धा घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का भांड, आणि इयत्ता नववीची कुमारी ज्ञानेश्वरी पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौभनकर मॅडम यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले.






