Home जळगाव जूलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या खंडव्याच्या हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाईची मागणी

जूलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या खंडव्याच्या हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाईची मागणी

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0093.jpg

जूलूसमध्ये आक्षेपार्ह घोषणाबाजी करणाऱ्या खंडव्याच्या हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाईची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – खंडवा (मध्यप्रदेश) येथे मुस्लीम बांधवांच्या वतीने ईद मिलादची रॅली (जुलूस) काढण्यात आली होती. या रॅलीत हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंानी आक्षेपार्ह घोषणाबाजी करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृत्यास चालना देवून राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वजनिक शांततेला धोका पोहचण्याचे काम केले आहे. या कृत्याचा चाळीसगाव येथील मुस्लीम बांधवांनी तीव्र निषेध केला असून हाश्मी गृपच्या पदाधिकाऱ्यंावर कारवाई करावी अशी मागणी चाळीसगाव शहर पोलीसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असगर सैय्यद महेबूब यांच्यासह समाजबंाधवांनी दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 29 सप्टेंबर रोजी इस्लाम धर्माचे शेवटचे पैंगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सलल्लाहू अलैही वसल्लम यांच्या जन्मदिनानिमीत्त खंडवा येथे धार्मीक रॅली काढण्यात आली.त्यात हाश्मी गृपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इस्लाम धर्मीय समर्थक सामील झाले होते. ही रॅली रस्त्याने जात असतांना हाश्मी गृपच्या काही सदस्यंानी सार्वजनिक शांतता बिघडावी म्हणून आक्षेपार्ह घोषणाबाजी केली.त्यामुळे मुस्लीम समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या रॅलीत लहान मुलांना आपत्तीजनक घोषणा शिकवणारे व त्यांना घोषणा देण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर असगर सैय्यद, तन्वीर शेख, सोनू शाह, सलीम सैय्यद, अजमल खान, अफरोज खान, इद्रीस शाह, अजमल खान, फिरोज जहागिरदार, शरीफ मिर्झा यांच्या सहया आहेत.निवेदन पोलीस अधीक्षक जळगाव, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांना पाठवण्यात आले आहे

Previous articleपोलीस स्टेशन लोहा येथे स्वच्छता पंधरवाडा उपक्रम राबविण्यात आला
Next articleवाळू व मुरूमची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here