Home जळगाव वाळू व मुरूमची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

वाळू व मुरूमची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0056.jpg

वाळू व मुरूमची चोरटी वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – चाळीसगाव येथे महसूल व पोलीस प्रशासनाने दोन वेगवेगळ्या कारवाईत अवैध वाळू व मुरूम वाहतुक करणारे चार ट्रॅक्टर पकडले. नकली नोटा घेऊन कुणीतरी गावात आल्याची माहिती मिळाल्याने तपासासाठी जाणाऱ्या पोलीसांच्या हाती अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर हाती लागले.याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
हवालदार कैलास पाटील, पोना. गोवर्धन बोरसे असे रोहीणी गावाकडे जात असतांना तळेगाव ते रोहीणी दरम्यान रेाहीणी गाावाकडे लाल रंगाचे दोन ट्रॅक्टर येतांना दिसले.त्यात वाळू भरलेेली होती. पोलीसाांनी ही वाहने थांबवून वाळू वाहतुकीबाबत विचारले असता त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही शासकीय परवाना मिळून आला नाही. नायडोंगरी हद्दीतून वाळू भरून हे ट्रॅक्टर तळेगावकडे जात होते.पोलीसांनी एमएच.41 एझेड.1181 व एमएच.41 डी.8578 ही दोन ट्रॅक्टर जप्त केली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालक संजय बाबासाहेब महानोर,ज्ञानेश्वर श्रीराम अहिरे दोन्ही रा. नायडोंगरी यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हवालदार कैलास पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल विभागाचीही कारवाई
दुसऱ्या एका घटनेत हातले मंडळाचे मंडळाधिकारी काल रात्री गस्त घालत असतांना अवैधरित्या मुरूम वाहतुक करणारे दोन ट्रॅक्टर हाती लागली. महसूल पथकाने एमएच.19 ईए.7064 व एमएच.19 ईए.5159 या क्रमांकाची दोन ट्रॅक्टर पकडली आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीसांच्या हवाली केले.याप्रकरणी ग्रामीण पोलीसात मंडळाधिकाऱ्यांनी तक्रार दिल्याचे कळते. ही ट्रॅक्टर कुणाची आहेत हे समजून आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here