Home नांदेड माजी कृषिराज्यमंञी आमदार सदाभाऊ खोत यांनी केले माकणीच्या गवलवाड कुंटुबियाचे सात्वंन व...

माजी कृषिराज्यमंञी आमदार सदाभाऊ खोत यांनी केले माकणीच्या गवलवाड कुंटुबियाचे सात्वंन व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन कबनुर येथील अतिवृष्टीबाधीत शेतकर्‍यांशी साधला संवाद.

108
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी कृषिराज्यमंञी आमदार सदाभाऊ खोत यांनी केले माकणीच्या गवलवाड कुंटुबियाचे सात्वंन व नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन कबनुर येथील अतिवृष्टीबाधीत शेतकर्‍यांशी साधला संवाद.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
▪️पुरात वाहून गेलेल्या मृत्युमुखी झालेल्या गवलवाड कुटुंबीयांचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत साहेबांनी सात्वंन केले.

सदाभाऊ खोत यांना पाहताच कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला.

तहसिलदार काशीनाथ पाटील यांना दुरध्वनी द्वारे तात्काळ मदत देण्याचे दिले निर्देश

कबनुर येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.

कोळनुर येथील उमाकांत चव्हाण या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली.
तसेच लेंडी प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांची समस्या जाणून घेतल्या.
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे आज मुखेड तालुक्याच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर होते त्यांनी तालुक्यातील कबनुर,माकणी,कोळनुर या गावातील शेतनुकसानीची पाहणी करुन माकणी येथील पुरात वाहुन गेलेल्या स्व.गणपत गवलवाड यांच्या कुंटूबियांचे सात्वंन केले. यावेळी त्यांच्यासमवेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पाडुरंग शिंदे,जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणेऊपस्थितीत होते.
आ.सदाभाऊ खोत यांनी देगलुर येथुन भायेगाव मार्गे येताना कोळनुर येथील उमाकांत चव्हाण यांच्या नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी यावेळी शेतकरी पुत्र विठ्ठलराव पाटील,रमाकांत पाटील,निळकंठ पाटील कोळनुरकर,राजु पाटील हे ऊपस्थितीत होते

तेथुन माकणी स्व. येथील गणत माधव गवलवाड हे अतिवृष्टीमुळे पुरात वाहुन जावुन दुर्देवी मृत्यु झालेल्या कुंटूंबाचे सात्वंन केले यावेळी सदाभाऊ येताच गवलवाड कुंटूबियानी एकच हंबरडा फोडला आणी आमचा घरातील कर्ता पुरुष गेला शासनाची अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही आणी कोणीही आमच्या कुंटुबाला भेटायला आल नाही यामुळे प्रशासनाची मदत मिळाली नसल्याचे सांगीतल्यावर तात्काळ सदाभाऊ खोत यांनी तहसिलदार काशीनाथ पाटील यांच्याशी दुरध्वनी द्वारे संवाद साधुन लवकारात लवकर गवलवाड कुंटूबियांना मदत देण्याचे निर्देश दिले.यावेळी सरकारने अतिवृष्टी बाधीत शेतकर्‍यांना हेक्टरी 60 हजार रुपये तर पुरात वाहुन गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखाची मदत देवुन त्यांच्या मुलांची शिक्षणाची व पालकत्व राज्य शासनाने स्विकारण्याची मागणी आम्ही सभागृहात लावुन सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडु अस सदाभाऊ यांनी माकणी येथील गवलवाड कुंटुबियाची भेट घेवुन पञकार परीषदेत केली.यावेळी माकणीचे सरपंच डाँ.प्रविण गव्हाणे ऊपस्थितीत होते.
यानंतर मौजे कबनुर येथील रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवुन कुंंटुबियांची आस्थेवाईकपणे चर्चा केली.कबनुर येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला यावेळी कबनुरचे सरपंच प्रतिनिधी पंढरी कांबळे,शेतकरी माधव देशमुख यांनी सदाभाऊचा राजकीय प्रवास ऊपस्थितांना सांगीतला व मनोगत व्यक्त केले.यानंतर बालाजीराव वडजे यांनी शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या यावर सदाभाऊनी यांनी मि मंञीमंडळात असताना शेतकर्‍यांना सरसकट मदत केली 2019 चा शासन निर्णयाप्रमाणे सरकारने मदत करावी नांदेड जिल्ह्यातील शेतीचे पिकांचे खुप मोठे नुकसान असुन आमच्या सरकारच्या काळात आम्हि ज्या पध्दतीने मदत केली तशी 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली व शेतकर्‍यांनी सरकारच्या आपआपल्या जिल्ह्यातील पालकमंञ्याकडे नुकसान भरपाईची मागणी करण्याचे आवाहन केले.सदाभाऊ खोत येणार असल्याने कबनुर माकणी कोळनुर परीसरात मोठ्या संख्येने शेतकरी ऊपस्थितीत होते. यावेळि रयत क्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्षा वर्षाताई कोल्हे, जिल्हाध्यक्ष पाडंव मुंगनाळे,विनोद वंजारे,शिवाजी गायकवाड,राहुल देशमुख,पवण हराळे,प्रशांत देशमुख,गफार शेख आदी उपस्थीतीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here