Home गुन्हेगारी अवैधरित्या खैर व सागवान झाडांची तोड करून अवैधरीत्या वाहतूक करत असताना तीन...

अवैधरित्या खैर व सागवान झाडांची तोड करून अवैधरीत्या वाहतूक करत असताना तीन आरोपी सह महिंद्रा पिकअप वाहन जप्त

143
0

राजेंद्र पाटील राऊत

अवैधरित्या खैर व सागवान झाडांची तोड करून अवैधरीत्या वाहतूक करत असताना तीन आरोपी सह महिंद्रा पिकअप वाहन जप्त                                                                       पालघर,(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-

वन विकास महामंडळ वन प्रकल्प विभाग ठाणे अंतर्गत वनपरिक्षेत्र शिरसाड,मांडवी व गणेशपुरी मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कारवाई
दिनांक 5 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे रात्रपाळी गस्तीवर असलेले वन विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी हे दिनांक 6/10/2021 रोजी खडकी चिंबीपाडा या भागात रात्रपाळी गस्त करीत होते पहाटे 03:30 वाजता मौजे पिंपळशेत गावानजीक एक वाहन संशयास्पदरीत्या हालचाली करत असताना दिसून आले अंधारात सर्व अधिकारी व कर्मचारी हे रस्त्यावर दबा धरून बसले पहाटे ०४:५० वाजता पिंपळशेत गावाकडून एक वाहन भरधाव वेगाने येत असताना दिसले त्या वाहनास सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रस्त्यावर विजेरीच्या साह्याने तसेच रस्त्यावर दगड गोटे टाकून अटकाव करण्याचा प्रयत्न केला परंतु सदर वाहन भरधाव वेगाने पारोळ या गावाकडे निघाले सदर वाहनाचे पाठलाग करून वाहनास पारोळ गावानजीक अटकाव करण्यास यश मिळाले सदरचे वाहन हे महिंद्रा GENIO पिकअप वाहन क्रमांक MH03AH5124 असून सदरच्या वाहनातून मुख्य आरोपी हसिम मुल्ला वय ४८व त्यांचे दोन साथीदार सर्व राहणार पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेऊन सदरच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे १०० नग०. ५७१ घनमीटर तसेच साग चौपाट ७१ नग १.५०० घनमीटर वन उपज जप्त जप्त केलेल्या मालाची किंमत जवळपास एक लाख रुपये तसेच वाहनांची किंमत 2 लाख 50 हजार रुपये असा एकूण साडेतीन लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आले सदर प्रकरणात आरोपी वर भारतीय वन अधिनियम 1927 कलम ५२(१) (१A) ४१(१) (२) (ड) (ई) तसेच महाराष्ट्र झाड तोडणे अधिनियम 1964 कलम५(२) प्रमाणे वन गुन्हा नोंद करून सदर प्रकरणातील आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली
सदरची कार्यवाही ही माननीय विभागीय व्यवस्थापक सो योगेश वाघये तसेच सहाय्यक व्यवस्थापक ठाणे १ जे यु पिसाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बी एम जाधव वनक्षेत्रपाल शिरसाड यांच्यासह वनपाल के व्ही सानप, यस ए रणमले, एस एस भामरे, एम बी सोलंकी, आर डी चव्हाण, तसेच वनरक्षक बी बी गायकवाड, एस जी सनवारे, पी डी खोसरे, संतोष गायकवाड, एम यु जीगुरे, आर डी राठोड, वाहन चालक उद्धव इरकर यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here