Home उतर महाराष्ट्र कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

57
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_171415.jpg

कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

सोनई, ता.९. कारभारी गव्हाणे: मुळा एज्युकेशन संस्थेच्या कृषी महाविद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात झाला. यावेळी असोसिएशन कार्यालयाचे उदघाटन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. ‘मुळा’चे सहसचिव डॉ. विनायक देशमुख, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, प्रा. विजय गवांदे, माजी विद्यार्थी व शिरपूरचे नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र इंगळे, रोहित

पाटील, सागर इंगळे उपस्थित होते. माजी विद्यार्थी व नगरचे कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे भाषण झाले. उदयन गडाख म्हणाले, आयुष्यात मित्र परिवार खूप महत्त्वाचा असून, शालेय जीवनातील मित्रत्व आनंदाची देणगी असते. एकत्र येऊन केलेले सामाजिक कार्य इतर मित्रांसाठी प्रेरणादायक असते, असेही त्यांनी सांगितले. कृषी महाविद्यालय अॅल्युमिनी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. अनुप दरंदले, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र दहातोंडे व सचिव योगेश दरंदले यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. अमित मखरे यांनी आभार मानले.

Previous articleधर्मनाथ बीज तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व
Next articleगडचिरोली शहरात हर घर जोडो अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here