Home सामाजिक धर्मनाथ बीज तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व

धर्मनाथ बीज तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व

57
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_170903.jpg

धर्मनाथ बीज तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व

माघ महिन्यातील द्वितीया, जिला धर्मनाथ बीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचा ही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला. व देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी ईच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी “धर्मनाथ बीजेचा” उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला. गोरक्षनाथानें आपल्या ‘किमयागिरी’ नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपापल्या शक्तिनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.
राजा त्रिविक्रमाच्या मृत्युपश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरू योगी मच्छिंद्रनाथ ह्यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर १२ वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरुपी पुत्राची प्राप्ती झाली ज्यांचे नाव “धर्मनाथ” ठेवण्यात आले.१२ वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिन्द्रनाथानी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळरुपात आले, परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होतेच. तिने आपल्या पुत्राला, धर्मनाथ ह्यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करवून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथ ह्यांनी आशीर्वाद दिला की १२ वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ ह्याचे कडून धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल.१२ वर्षांनी “माघ शुद्ध द्वितीया” ह्या दिवशी गोरक्षनाथ ह्यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली.धर्मनाथ पिता त्रिविक्रम यांचा मृत्यू झाल्यानंतर शोक सागरात बुडाला. तेव्हा माता रेवती राणी हिने तुझा पिता मच्छिंद्र नाथ असून ते जिवंत आहे, असे सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा, म्हणुन धर्मनाथानें रेवती राणीस विचारल्यानंतर तिनें मच्छिंद्रनाथाच्या परकायाप्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली. ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानिशीं शिवालयांत गेला व मच्छिंद्रनाथाच्या पायां पडून त्यास पालखींत बसवून राजवाड्यांत घेऊन आला. तो एक वर्षभर तेथं होता. नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ, चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले. त्यासमयीं धर्मनाथास परम दुःख झालें. तोहि त्यांच्यासमागमें तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला. तेव्हां मच्छिंद्रनथानें त्याची समजुत केली कीं, मी बारा वर्षांनीं परत येईन; त्या वेळीं गोरक्षनाथाकडून तुला दिक्षा देववीन व मजसमागमें घेऊन जाईन. आतां तूं रेवतीची सेवा करून आनंदानें राज्य वैभवाचा उपभोग घे. अशा रीतीनें मच्छिंद्रनाथानें त्याची समजुत केल्यावर ते तिघे तेथून निघाले.तीर्थयात्रा करीत बारा वर्षानीं ते पुन्हा प्रयाग नगरीस आले. त्या वेळेस धर्मनाथराजास पुत्र झाला असुन त्यांचें नांव त्रिविक्रम असं ठेविलें होतें. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, चौरंगीनाथ आणि अडभंगीनाथ गांवांत आल्याची बातमी धर्मनाथास समजांच तो त्यास सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला. धर्मनाथानें आपल्या मुलास राज्यावर बसवुन आपण योगदीक्षा घेण्याचा निश्चय केला. माघ महिन्यांतील पुण्यतीथी द्वितीया, जिला धर्मबीज असें म्हणतात, त्या दिवशीं गोरक्षनाथानें धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दीली. त्या वेळेस सर्व देव बोलाविले होते. नगरवासी लोकांचाहि मोठा मेळा जमला होता. सर्वजण प्रसाद घेऊन आनंदानें आपपल्या स्थानीं गेले. दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धां सर्वांनीं आपली इच्छा दर्शविली. मग ‘ धर्मनाथबीजेचा’ उत्सव प्रतिवर्षीं करण्याची गोरक्षानें त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.गोरक्षनाथानें आपल्या ‘किमयागिरी’ नामक ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं. आपपल्या शक्त्यनुसार जो कोणी हें बीजेचें व्रत करील त्याच्या घरीं दोष, दारिद्र्य, रोग आदिकरुन विघ्नें स्वप्नांत देखील यावयाची नाहींत. त्या पुरुषांचा संसार सुयंत्रित चालेल प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृहीं वास्तव्य करील. याप्रमाणें धर्मनाथ बीजेचा महिमा होय.धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर, त्यास घेऊन निघाले. त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरीकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायांवर घातलें व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविलें. नंतर, बारा वर्षांनीं परत येऊं असें सांगुन तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतांच ते पुनः बदरिकाश्रमास गेले मग तेथें मोठ्या थाटानें मावंदे केलें. मावंद्याकरितां सर्व देवांना बोलावून आणलें होतें. मावदें झाल्यावर सर्व देव वर देऊन निघुन गेले. व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ, अडभंगनाथ व धर्मनाथ असे पांचीजण पुन्हा पुढे तीर्थयात्रेस निघाले.धर्मनाथाला नाथ दिक्षा देण्याचा सोहळा इतका अमुल्य झाला होता की, गोरक्षनाथ ह्यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की, जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान धर्म, पुण्य कर्म करील, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख, शांती, धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील.हा सोहळा “धर्मनाथ बीज” ह्या उत्सवाने ओळखला जातो.

रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष-वारकरी मंच महाराष्ट्र राज्य

Previous articleराजेंद्र पाटील राऊत यांना “शिवछत्रपती सन्मान पुरस्कार २०२४ जाहिर
Next articleकृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here