Home नाशिक राजेंद्र पाटील राऊत यांना “शिवछत्रपती सन्मान पुरस्कार २०२४ जाहिर

राजेंद्र पाटील राऊत यांना “शिवछत्रपती सन्मान पुरस्कार २०२४ जाहिर

162

आशाताई बच्छाव

IMG_20240121_220840.jpg

राजेंद्र पाटील राऊत यांना “शिवछत्रपती सन्मान पुरस्कार २०२४ जाहिर
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव-युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांना छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे देण्यात येणारा “शिवछत्रपती सन्मान पुरस्कार २०२४”जाहिर झाला असून, या पुरस्काराची घोषणा आज शुक्रवार (दि.९ रोजी) छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक शरद (अण्णा) पवार यांनी केली.
समाजातल्या तळागाळातील लोकांसाठी निरपेक्ष व निस्वार्थ भावनेने स्वतः चा प्रपंच सांभाळून समाजसेवा करण-या व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पंच्याहत्तर पुरस्कार्थीचा सन्मान केला जाणार आहे. राजेंद्र पाटील राऊत यांनी स्वबळावर युवा मराठा महासंघाची स्थापना करून तळागाळातल्या अठरा पगड जाती धर्माच्या बारा बलुतेदारांची समाजसेवेच्या माध्यमातून सेवा केल्याने व पत्रकारितेतून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरूद्ध सातत्याने आवाज उठविल्याने त्यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे छावा संघटनेच्या अँड अलका मोरे पाटील यांनी सांगितले.
रविवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार खालील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.डाँ.अनिरूध्द धर्माधिकारी, विलास पाटील संपादक सक्षम पोलिस टाईम्स, विलास सुर्यवंशी संपादक नाशिक स्टार न्यूज, मिलिंद सजगुरे संपादक दै पुढारी,अजय भोसले संपादक लक्ष महाराष्ट्र, दिलीप सुर्यवंशी संपादक आपलं महानगर,तर प्रकाश जगताप अध्यक्ष कल्याण वकील संघ  पुरस्कार वितरण समारंभ नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहात पार पडणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

Previous articleआर.सी.एफ.च्या वतीने गरजू मुलांना मिठाई वाटप केले
Next articleधर्मनाथ बीज तिथीला नाथ पंथात विशेष महत्त्व
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.