आशाताई बच्छाव
आर.सी.एफ.च्या वतीने गरजू मुलांना मिठाई वाटप केले
सविता तावरे-मुंबई स्पेशल रीपोर्टर
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ने 8 फेब्रुवारी 2024 रोजी CSR डिपार्टमेंट आणि NGO, चंद्रा
सुंदर ट्रस्ट यांच्या मदतीने कर्करोग रुग्ण, शाळा, अनाथ आणि मतिमंद मुलांसाठी मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. श्री मधुकर पाचर्णे, उपमहाव्यवस्थापक (Corp Comm/CSR) यांनी आपल्या प्रेरक शब्दांनी आणि प्रोत्साहनाने प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. सोबत होते; श्री राजेंद्र साबळे, अधिकारी (कॉर्प कम्युनिकेशन), श्री बाबू जोगदंड, सचिव, चंद्रा सुंद्रा ट्रस्ट, श्री हेन्री सॅम्युअल, कार्याध्यक्ष, चंद्रा सुंद्रा ट्रस्ट आणि श्रीमती वैशाली कांबळे, कार्यकारी सचिव, चंद्रा सुंद्रा ट्रस्ट. कॅन्सरच्या रुग्णांसाठी श्रद्धा फाउंडेशन, अनाथ मुलांसाठी बालकल्याण नगरी, मतिमंद मुलांसाठी स्वामी विवेकानंद शाळा, आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी शारदा विद्या मंदिर शाळा आणि ICDS आंगनवाड़ी झोपडपट्टीतील मुलांसाठी साई एज्युकेशन ट्रस्ट अशा पाच ठिकाणी मिठाईची जवळपास 700 पाकिटे वितरित करण्यात आली. मिठाई पद्धतशीरपणे या गरजू मुलांकडे सुपूर्द करण्यात. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने या भागात केलेल्या अनेक सी.एस.आर. प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प होता.