Home नांदेड उंद्री प.दे.चे सेवानिवृत्त पोलिस पाटील तथा पोस्ट मास्तर गणेशराव पा. वडजे यांचे...

उंद्री प.दे.चे सेवानिवृत्त पोलिस पाटील तथा पोस्ट मास्तर गणेशराव पा. वडजे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन.

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0038.jpg

उंद्री प.दे.चे सेवानिवृत्त पोलिस पाटील तथा पोस्ट मास्तर गणेशराव पा. वडजे यांचे प्रदिर्घ आजाराने निधन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – उंद्री प.दे. नगरीचे जेष्ठ नागरीक गणेशराव शामराव पाटील वडजे यांचे दिनांक २३डिसेंबर रोज शुक्रवार सकाळी ६.३० वाजता प्रदिर्घ आजाराने वयाच्या ६५ साव्या वर्षी निधन झाले त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी ४.०० वाजता मोठ्या दुखाच्या वातावरणात अंतविधी झाला . त्यांना डायबेटिस,पॅरालेसीस अशा आजाराने ते गेल्या अनेक वर्षापासुन त्रस्त होते.त्यांच्या पश्चात तीन मुल पत्नी, नात, नातु, भाऊ, बहिण असा मोठा परिवार आहे.आज त्यांच्या जाणाने त्यांच्या परिवारावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या जिवनात अनेक मोठमोठी संकटे आली त्या संकटावर मात करुन त्यांनी पोलिस पाटील व ब्रांच पोस्ट मास्तर अशी दोन नोकरी पद त्यांनी भुषविले .पोलिस पाटील पदावरुन पाच वर्षाखाली सेवानिवृत्त झाले होते तर शाखा डाक अधिकारी या पदावर ते कार्यान्वित होते.ते गावात कायदे पंडित म्हणून त्यांची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केले होते. सामाजिक ,राजकीय,
शैक्षणिक,अध्यात्मिक, धार्मिक,क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनिय होते.
त्यांना नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक व्हि. व्हि. लक्ष्मीनारायण, अमिताभ गुप्ता,व्हि. एन. जाधव साहेब व महाराष्ट्र गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भिकाजी पाटील कोल्हापुरकर यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गणेशराव पाटील यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.तर पोस्ट अधिक्षक एन. बि. धर्मा,एस. एम. अली,एच. आर. मांडवे,व आर. व्हि. पाळेकर‌ साहेब यांच्या कार्यकाळात त्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आले होते असे त्यांचे महान कार्य होते.त्यांच्या अशा जाण्याने समाजात कधी भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली.
त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी वेळी जिल्ह्यातील पोलिस प्रशासनील अधिकारी कर्मचारी, पोलिस पाटील संघटनेतील असंख्य पोलिस पाटील, पोस्ट डाक विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी , मित्र, नातेवाईक, तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील पुढारी, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील सामाजिक संघटनेतील मान्यवर यांच्या उपस्थितीत दुखाच्या वातावरणात अंत्यविधी पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here