Home सामाजिक मनन चिंतन💚 विषय:-मुलांना (children) वडिलांपेक्षा आईच का अधिक आवडते? उत्तम संतती व...

मनन चिंतन💚 विषय:-मुलांना (children) वडिलांपेक्षा आईच का अधिक आवडते? उत्तम संतती व बालसंस्कार निर्माण व्हावी यासाठी दोघांच्या भूमिका कशा वेगवेगळ्या व पूरक आहेत?

22
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG_20240204_181203.jpg

🌞मनन चिंतन💚

विषय:-मुलांना (children) वडिलांपेक्षा आईच का अधिक आवडते? उत्तम संतती व बालसंस्कार निर्माण व्हावी यासाठी दोघांच्या भूमिका कशा वेगवेगळ्या व पूरक आहेत?

सर्वसाधारण निष्कर्ष

खरे तर अध्यात्मात तुलना करायचीच नसते. तरीही कल्याणकारी अर्थाने लिहीत आहे.

आई सहसा मुलांना कामे सांगत नाही उलट त्यांची सगळी कामे स्वतःच करते.

वडील मुलांना सतत व वेगवेगळी कामे सांगतात. मुलांची कामे स्वतः करण्याचे टाळतात. त्यांना आपली मुले स्वावलंबी, स्वयंपूर्ण व्हावीत असे वाटते.

साधा चुमुक काटा पायात मोडला तरी आपल्या तोंडून सहज शब्द बाहेर पडतो आई गंS आणि अचानक एखादे मोठे संकट उभे ठाकले तर मुखातून सहजोद्गार निघतात बापरेS. हो ना? याला काय कारण आसावे?

लहान लहान संकटप्रसंगी माणसाला आईची माया आठवते पण संकटप्रसंगी बापाची शिकवण, शिस्त आठवते. संकटाला शांत, स्थिर चित्ताने सामोरे जावे हे बापाने शिकविलेले असते.

आई मुलांवर केवळ प्रेम करते. त्यांच्याकडून तिला शिस्तीची अपेक्षा असतेच असे नाही.

वडील मुलांवर प्रेम करतातच पण त्यांच्याकडून शिस्त पालनाची पण त्यांची अपेक्षा असते.

आई मुलांच्यासाठी स्वातंत्र्याचा हुकमी एक्काच असतो!

वडील मुलांना मर्यादित स्वातंत्र्य देतात. स्वधर्म व धर्मरक्षणासाठी बंधने व अटींचा त्यात कटाक्षाने समावेश असतो.

मला सांगा, जर असे असेल तर मग मुलांना आईच जास्त आवडणार ना!

प्रयोग म्हणून आईने काही दिवस वडिलांची भूमिका करून बघावी, लगेच दोहोतील भेद जाणवेल.

याला अपवादही असतात, काही ठिकाणी आई मुलांशी कडक वागते तर वडील मवाळ धोरण स्विकारतात. काही ठिकाणी दोघेही कडक तर काही ठिकाणी दोघेही मवाळ असतात.

वरील विषय एकांगी होऊ नये म्हणून काय असावे याबद्दल थोडे विवेचन करूया.

पालक सदैव बरोबरच असतात असा काही वैश्विक सिद्धांत नाही.

तरीही अल्पशा जीवनाचा संपादित अनुभव व ज्ञान याच्या आधारे पालक आपल्या मुलांचे संगोपन करतात. आपल्या मुलांनी आपल्यापेक्षाही अधिक गुणवान, धनवान, कीर्तिवान, चारित्र्यवान व्हावे आणि आनंदी राहून सुखी संसार करावा, त्यांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक स्वास्थ्य उत्तम असावे हाच त्यांचा हेतू असतो.

आज जी लहान बालके आहेत ती उद्या पालक झाल्यावर त्यांचीही हीच अवस्था आणि विचारसरणी असणार आहे.

परंतु हे सर्व सिद्ध होण्यासाठी पुस्तकी शिक्षणासोबत अत्यंत गरजेचा आहे मुलांच्या विवेकशील बुद्धीचा अमर्याद विकास.

हे जग निसर्ग नियमाप्रमाणे चालते. त्यालाच आपण म्हणतो निसर्गधर्म. परंतु या निसर्गावर अधिपत्य गाजवण्याची तात्पुरती जबाबदारी परम्यातम्याने माणसावर सोपवली असून त्यासाठी अट एकच आहे मनुष्यधर्माचे तंतोतंत पालन. त्यालाच आदी सनातन देवी देवता धर्मही म्हणता येईल.

धर्म म्हटले की व्यक्तीचे व्यक्तिगत व सामाजिक आचरण श्रेष्ठ हवे. असे श्रेष्ठ आचरण सर्वांना अनुभवायचे असेल तर शिस्त, अनुशासन व बंधने असायलाच हवीत.

शिस्त व बंधनांची सीमा ठरवताना विवेकी बुद्धीचाच उपयोग प्रत्येक मनुष्याला करावा लागतो.

विवेकी बुद्धी म्हणजे काय हे थोडक्यात असे सांगता येईल.

Love (unconditional प्रेम) & Law (कौटुंबिक व सामाजिक, राष्ट्रीय कायदा),

तसेच व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय Freedom (स्वातंत्र्य) & Discipline (शिस्त)

या चार शब्दातील हेतूंचा स्थळ, काळ, व्यक्ती, परिस्थितीच्या आधारे समन्वय, संतुलन (बॅलन्स) जो परम्यातम्याशी अनुसंधान, Resonanace (अनुनाद), Harmony (सुसंवाद) साधून निर्माण झालेलं असेल.

टीप:-

१) वरील तुलना कमी व अधिक या अर्थाने घ्यावी. याला अनेक अपवादही असतील हे लक्षात घ्यावे.

२) तुलना करू नका, सगळ्याच भूमिका आपापल्या जागी योग्य व आवश्यक आहेत.

३) प्रेमाची अध्यात्मिक व्याख्या ही अपेक्षारहित प्रेम (unconditional Love) अशीच आहे.

४) वरील लेखातून आपल्या ध्यानात आले असेल की या विवेकशील बुद्धितील आई हा प्रेम (Love) व Freedom (स्वातंत्र्य) याचा प्रतिकात्मक रोल/जबाबदारी आहे, तर कायदा (Law) व शिस्त (Discipline) याचा प्रतिकात्मक रोल/जबाबदारी वडील आहेत.

मुलांची इच्छा असो किंवा नसो, धर्माचे रक्षण होण्यासाठी दोघांच्या भूमिकांची समान आवश्यकता आहे.

🙏शिवाजी कणसे कामोठे मुंबई 🌞8208870761🇮🇳04.06.2022💚🌹🌈🕉️

🌼वरील लेखाला सुसंस्कारित व शुद्ध करण्याचं भाग्य लाभलंय आदरनिय श्री. दिवाकर बुरसे, काका, पुणे वय-74 यांचं. त्यांचा शतशः मी ऋणी आहे. +919552629245 🌼💚🌹🌼🕉️

Previous articleविषय- जाहिराती चांगल्या की वाईट **************************
Next article🙏🏻 मनन चिंतन🙏🏻 विषय:- स्वधर्माची व्याख्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here