Home Breaking News ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

122
0

🛑 ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 22 सप्टेंबर : ⭕ मराठी चित्रपट आणि नाट्य विश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या आणि एक काळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. त्यांची coronavirus covid 19 कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.

सातारा येथील रुग्णालयात त्यांच्यावर यासाठीचे उपचारही सुरु होते पण, अखेर कोरोनाशी त्यांचा लढा अपयशी ठरला. सातारा येथील फलटण तालुक्यात ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

१६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर सोमवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त समोर आलं.

मागील महिन्याभरापासून या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली होती. याचदरम्यान  मालिकेच्या सेटवरील काहीजणांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर साऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आशालता वाबगावकर यांचा देखील समावेश होता.

जवळपास ४० हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.निलांबरी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या मालेगांवजवळील कौळाणे (निं) गावी दिग्दर्शक सतिश रणदिवे यांच्यासमवेत आल्या असता त्यांनी त्यावेळी पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे भरभरुन कौतुक केले होते,त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीत मोठीच पोकळी निर्माण झाली आहे,युवा मराठा न्युज महाराष्ट्र परिवाराची त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली!

Previous article*कोरोना योद्धा एक कर्तव्यदक्ष महीला मुख्याधिकारी* *युवा मराठा न्युजकडून झाला सन्मान*
Next article*पत्रकारांसाठी राज्यातील पाहिले* *कोविड सेंटर सातारा येथे सुरू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here