*कोरोना योद्धा एक कर्तव्यदक्ष महीला मुख्याधिकारी* *युवा मराठा न्युजकडून झाला सन्मान*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांवच्या शतकमोत्सवी नगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष महीला मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) यांचा कोरोना योद्धा सन्मानित केल्या बद्दल स्त्कार.
देशभरात सद्या कोरोना महामारीचे संकट आले आहे.
तसेच पेठ वडगांव शहरात कोरोना महामारी विरूध्द लढण्यासाठी स्वतः एक महीला अधिकारी असुन न डगमगता जिद्दीने ,धाडसाने ,धैर्याने वडगांवच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपययोजना राबवून , कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी
वेळोवेळी योग्य उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याची हिताचे निर्णय घेतले.
एक महिला असुन कोरोना विरूध्द लढण्यासाठी वडगांव शहरात उत्कृष्टरित्या कार्य केले.
वडगांव शहरातील नागरिकांना कोविड सारख्या महामारी संकटातून मुक्त करणेसाठी आपण पोलीस आधिकारी , आरोग्य कर्मचारी , पालिका कर्मचारी यांच्या सोबत महीला अधिकारी असुन जे कर्तव्य बजावले त्या कामाची पोहच पावती म्हणून आपणांस युवा मराठा न्युजच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानित करण्यात आले .
हा कोरोना योद्धा सन्मान बहाल करणेसाठी वडगांव नगर पालिकेच्या स्व.विजयसिंह यादव सभागृहामधे सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते .
यावेळी वडगांव नगर पालिकेच्या
कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ, देऊन
सत्कार पालिकेच्या स्व.विजयसिंह यादव सभागृहामधे युवा मराठा न्युजचे ब्युरोचिफ मोहन शिंदे व दिग्विजय कुशीरे (पाटील) किरण पाटील यांनी केला.
याप्रसंगी मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे म्हणाल्या कि हा कोरोना योद्धा पुरस्कार माझा नसुन पालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचारी , सफाई कर्मचारी ,
वडगांव शहरातील सर्व नागरिकांचा आहे. तसेच युवा मराठा न्युज ने माझ्या कार्याची दखल घेऊन कोरोना योद्धा सन्मानपत्र दिल्या बद्दल युवा मराठा न्युजचे मुख्य संपादक श्री.राजेंद्र पाटील (राऊत) यांचे व न्युज चँनेल चे आभार माणले.
यावेळी पालिकेचे कार्यालय निरीक्षक श्री.मारुती कदम , कर निरीक्षक श्री सुर्याजी भोपळे , ओंकार पाटील , अनिरूद्ध पाटील (सनी), प्रेम पाटील , मनोज कोठारी इत्यादी उपस्थित होते. तसेच वडगांव
नगर पालिकेच्या वतीने कर निरीक्षक श्री.सुर्याजी भोपळे यांनी आभार व्यक्त केले .




